Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गावठी दारु भट्ट्या उध्वस्त, तर गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एलसीबीची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर  - नव्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह पदभार स्विकरताचा कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्यात लाँकडाऊन असताना श्रीरामपूर येथे सुरु असणाऱ्या गावठी दारुभट्ट्यां उध्वस्त करुन ४ लाख रुपयांचे रसायन, गावठी दारुचा साठा जप्त करुन आरोपीवर कारवाई केली. तर दुसरीकडे खांडगाव फाटा (ता.संगमनेर) येथे भाजीपाल्याखाली गोमांस लपवून वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून ११०० किलो गोमांस जप्त करुन दोघांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अटक केली. 
दोन्ही कारवाई या जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस प्रमुख सागर पाटील, श्रीरामपूर अपर पोलिस प्रमुख दिपाली काळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments