Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खा.डॉ. सुजय विखे यांच्याकडून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी १कोटी रूपयांचा निधी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.३ - कोरोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी १ कोटी रूपयांचा निधीबरोबरच आपले एक महीन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता कोषात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खा. डाॅ.सुजय विखे यांनी म्हणले आहे की,कोरोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात एकजूटीने लढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत.सोशल डिस्टसिंगच्या माध्यमातून कोरोनाचे संकट रोखण्याचे उपाय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.दुसरीकडे कोरोना बाधीतांच्या उपायांकरीता पंतप्रधानांनी देशवासीयांना योगदान देण्यासाठी सर्वानी पुढे येण्याच्या केलेल्या आवाहानाला देशातील उद्योजक सेवाभावी संस्था आणि सामान्य नागरीक पुढे आले आहेत.पंतप्रधानाच्या या सहाय्यता निधीत योगदान म्हणून आपणही १कोटी रूपयांचा निधी जमा करण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे डाॅ.विखे यांनी स्पष्ट केले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कोरोनाचे संकट निवारण्यासाठी आपण विविध उपाय योजनांची अंमलबजावणी सुरु केली असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात टोल फ्री नंबर दिले आहेत.मतदारसंघातील जे नागरीक इतर ठिकाणी अडकले आहेत त्यांना आहे त्या ठीकाणीच मदत मिळावी म्हणून प्रयत्न सुरु केले असल्याचे डाॅ विखे पाटील यानी सांगितले.

Post a Comment

0 Comments