Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घरीच राहून स्वतः चे, कुटुंबाचे आणि देशाचे संरक्षण करा : जि.प.अध्यक्षा राजश्री घुले


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर

अहमदनगर दि.३ - जगभरात कोरोना (कोविड१९) विषाणूने थैमान घातले आहे. मार्च पहिल्या आठवड्यात कोरोना या विषाणूचा राज्यात शिरकाव झाल्याने हे मोठे संकट आले आहे. जिल्ह्यातील ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, सर्व जि.प.अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत सदस्य आपले कर्तव्य प्रामाणिक बजावत आहेत. असे असतानाही प्रत्येक नागरिकांनी 'मी माझा रक्षक' ही भूमिका घेऊन स्वतः चे, कुटुंबाचे आणि देशाचे संरक्षण करु शकता. त्यामुळे आपण घरीच राहण्याची भुमिका घ्या. वुहान(चीन) ते अहमदनगर(महाराष्ट्र) अंतर किती आहे आणि अहमदनगर ते आपलं घर अंतर किती आहे याचा
विचार करा. बाकी आपण सुज्ञ आहात, यासाठी प्रत्येकाने घरीच राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments