Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायतीकडून औषध फवारणी ; स्वतःला व कुटुंबास सुरक्षित ठेवा- सरपंच धनंजय बडे

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी  - तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रादुर्भावाच्या पाश्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार गावासह वाड्या-वस्त्यांवर जाऊन औषध फवारणी केली. यावेळी सरपंच धनंजय बडे यांनी,जगभरात कोरोना (कोविड१९) विषाणूने थैमान घातले आहे. मार्च पहिल्या आठवड्यात कोरोना या विषाणूचा राज्यात शिरकाव झाल्याने हे मोठे संकट आले आहे, असे सांगत त्यांनी प्रत्येकाने कोरोनाबाबत हालक्यात घेऊ नका. स्वतः सुरक्षित रहा आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा, असे आवाहन केले.
तसेच उपसरपंच अजिनाथ बडे व ग्रामपंचायत सदस्यांनी कोरोनाच्या पाश्वभुमीवर कोणती काळजी, घ्यावी, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली.

Post a Comment

0 Comments