Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्री द्वारकामाईत सुरू झालेले अखंड श्री साई चरित्र पारायण सांगता


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / राजेंद्र गडकरी
शिर्डी  दि.२ - शिर्डीत श्रीराम नवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस असल्याने आज पहाटे श्री साईंची काकड आरती करुन श्री साईंना मंगल स्नान घालण्यात आले, तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी आज श्री द्वारकामाईत उत्सवाच्या प्रारंभी सुरू झालेले अखंड श्री साई चरित्र पारायण सांगता आज होऊन श्री द्वारका माई येथून श्री साई प्रतिमा व पोथीची मिरवणूक काढण्यात आली, श्री द्वारकामाई तुन गुरुस्थान मार्गे ही मिरवणूक श्री साई समाधी मंदिरात आणण्यात आली , या टाळ मृदंगाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीत साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी आपल्या हातात वीणा तसेच उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आपल्या हातात पोथी घेतली होती, या मिरवणुकीत साई संस्थान चे अशोक आवटी ,किचवे यांनी आपल्या हातात श्री साई प्रतिमा धरली होती, या मिरवणुकीत संस्थानचे कार्यकारी अधिकारी यांच्या सुविद्य पत्नी सौ, अंजली डोंगरे व मोजके अधिकारी, पुजारी सामील झाले होते, दरवर्षी साई भक्तांची मोठी गर्दी या मिरवणुकीला होत असते, मात्र लॉक डाऊन मुळे यावेळी शांततेत व गर्दी न करता ही मिरवणूक पार पडली, ही मिरवणूक समाधी मंदिरात केल्यानंतर श्री समाधी मंदिरात श्री साईंची ठीक सहा वाजता।। शिर्डी माझे पंढरपुर।। आरती करण्यात आली, त्यानंतर सकाळी 06:15 वाजता साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ ,अंजली डोंगरे यांच्या हस्ते श्री साई समाधीची पाद्यपूजा करण्यात आली ,त्यानंतर सकाळी 6वाजून 45 मिनिटांनी लेंडी बागेतील शताब्दी ध्वज बदलण्यात आला, जुना काढून नवीन ध्वज तेथे फडकवण्यात आला ,त्यानंतर मंदिरात नवीन गव्हाच्या पोत्याची विधिवत पूजा करण्यात येऊन हे नवीन पोते श्री द्वारकामाईत जुने पोते काढून त्या जागी ठेवण्यात आले,
कोरोना च्या पार्श्वभूमी वर व लॉक डाऊन च्या काळात आलेला श्रीराम नवमी उत्सवचा आज मुख्य दिवस, ना गर्दी, ना पालख्या,ना साई भक्त ,नाविद्युत रोषणाई ,ना यात्रा , अशा वातावरणात साजरा होत आहे, 
काल सकाळी पहाटे श्री साईबाबांच्या मंदिरात श्रींची साई काकड आरती करून व त्यानंतर श्री साईनाथांना मंगलस्नान घालून 
श्री साईबाबा संस्थान च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रामनवमी उत्सवास धार्मिक विधी व पूजा-अर्चा करत नेहमीप्रमाणे पण विना साईभक्त व कर्मचारी ग्रामस्थ, यांच्या अनुपस्थितीत पण मोजक्या अधिकाऱ्यांच्या व पुजारी कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नेहमीच्या पद्धतीने प्रारंभ करण्यात आला होता, 
शिर्डीत श्री साईबाबा संस्थान व ग्रामस्थ यांच्या वतीने दरवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात व विविध कार्यक्रमाने साजरा केला जातो, तीन दिवस हा कार्यक्रम येथे मोठ्या उत्साहात सुरू असतो, साई संस्थांतर्फे विविध धर्मिक कार्यक्रम होतात, तसेच साई संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने ही विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्त्या, आदी कार्यक्रम होतात, रामनवमी उत्सवाला मुंबई तसेच राज्यातील, इतर राज्यातून मोठ्या संख्येने पायी साई पालख्या व साईभक्त, पदयात्री मोठ्या प्रमाणात येत असतात ,परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग वाढवू नये,या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभर 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन आहे, देशातील सर्व प्रसिद्ध मंदिरे भक्तांना दर्शनासाठी बंद आहेत, शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरही साई भक्त व सर्वांच्या साठी दर्शनासाठी 17 मार्च २०२० दुपारी तीन वाजेपासून बंद करण्यात आले आहे ,त्यामुळे यावर्षी श्रीरामनवमी उत्सवाचे आयोजित सर्व कार्यक्रम ग्रामस्थांनी रद्द केले आहेत, रामनवमीनिमित्त येथे भरणारी यात्राही रद्द झाली आहे , रामनवमी उत्सवानिमित्त मंदिर व परिसरात साई भक्त व कर्मचारी यांनाही प्रवेश नाही, मोजके अधिकारी-कर्मचारी व पुजारी यांनी श्री साईंची नित्यनेमाची आरती ,पूजा सुरू ठेवली आहे, आज तर शिर्डी येथे वर्षातला सर्वात मोठा श्रीराम नवमी उत्सव आहे ,जरी शिर्डी बंद असली व,सर्व काही बंद असले,आणि साईभक्त ,ग्रामस्थ कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात गर्दी नसली, तरी नित्यनियमाप्रमाणे याहीवर्षी येथे रामनवमी उत्सवाचे नियमाप्रमाणे विधीवत पूजाअर्चा होत आहे ,काल नेहमीप्रमाणे सकाळी श्री साईंची प्रतिमेची व ग्रंथाची पूजन करून श्री साई सच्चरित्र पारायण यांची सुरुवात करण्यात आली होती, या पारायणाची आज सांगता झाली.
जरी साईभक्त ,ग्रामस्थ, पदयात्री कर्मचारी मोठ्या संख्येने नसले तरी नित्यनियमा प्रमाणे श्री साईंची उत्सवानिमित्त पूजा-अर्चा विधिवत सुरू आहे,
श्रीराम नवमी निमित्त मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली आहे,
, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत सर्वकाही ठप्प आहे ,श्री साई समाधी मंदिर व परिसरही निर्मनुष्य झाल्यासारखा आहे, पण तरीही श्री साईंचा हा रामनवमी उत्सव या लॉकडाऊनच्या काळात सर्व नियम पाळत नेहमीप्रमाणे मोजक्या पुजारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात आहे,
, या रामनवमी उत्सवासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गठित झालेल्या श्री साईबाबा संस्थान समितीचे जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अाणेकर,सह, धर्मादाय आयुक्त गीता बनकर, अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान चे अरुण डोंगरे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखापाल बाबासाहेब घोरपडे, अशोक आवटी ,किचवे आदी अधिकारी व मोजके पुजारी कर्मचारी श्रीरामनवमी उत्सव साठी परिश्रम घेत आहेत,
 शिर्डी सह देश-विदेशातील साईभक्त हा रामनवमीचा उत्सव दरवर्षाप्रमाणे शिर्डीत येऊन साजरा करण्याऐवजी सध्या श्री साई बाबांवर श्रद्धा ठेवून आपापल्या घरात श्री साईंची पूजाअर्चा करून ,मनोभावे साजरा करत आहेत, अनेक जण या लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरात श्री साई सच्चरित्र पारायण वाचत आहेत, कुणी दररोज श्री साई स्तवन मंजिरी वाचत आहे, व बाबांची रामनवमीनिमित्त होणारी पूजा घर बसूनच करत असताना दिसत आहे, शिर्डीतील श्री साई बाबा चा श्रीराम नवमी उत्सव तीन दिवस चालणार असून अशा साध्या पद्धतीने व गर्दी न करता फक्त मोजके अधिकारी ,पुजारी यांच्या हस्ते हा रामनवमी उत्सव विधिवत कार्यक्रम करून साजरा करण्यात येत आहे, 
प्रथमच श्री साई बाबांचा उत्सव अशा शांत पद्धतीने साजरा होत आहे, रामनवमी उत्सव निमित्त घरातल्या घरात श्री साईभक्तांनी कोरोनाचे संकट टळू दे म्हणून श्री साईचरणी साकडे घातले आहे, उदया श्री रामनवमी उत्सवाचा सांगता दिन आहे.

Post a Comment

0 Comments