Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मोबाईल चोरणारे चोरटे जेरबंद ; एलसीबीची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : येथील एमआयडीसी मधील श्रीराम इंजिनियरिंग कंपनीतील मोबाईल चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. विठ्ठल महादेव गिते (वय २३, रा.माळीवाडा, बारातोटी कारंजा, अ.नगर), निखिल नारायण आहिरे (वय १९, रा.झारेकरगल्ली, नालेगाव, अ.नगर), विशाल अशोक गायकवाड (वय १९, झारेकरगल्ली,नालेगाव, अ.नगर) अशी पकडण्यात आलेल्या तिघांची नावे असून दिनेश तरवडे (पूर्ण नाव माहिती नाही रा.साईराम सो. शिवाजीनगर, अ.नगर) हा फरार आहे.
दि.२४ एप्रिलला ६.३० वाजण्याच्या सुमारास खोलीचा दरवाजा उघडा ठेवून साथीदारासह झोपलेले असताना, अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये घुसून साथीदारांचे तीन मोबाइल असा एकूण १२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याची फिर्याद राजेशकुमार सवाली महतो यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपासादरम्यान, हा गुन्हा विठ्ठल महादेव गिते (वय २३, रा.माळीवाडा, बारातोटी कारंजा, अ.नगर) याने केल्याची गोपनीय माहिती एलसीबी पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुषंगाने आरोपी गिते याचा शोध घेऊन त्याला अहमदनगरातील कल्याणरोडवरील जाधव लाँन्सच्या मागील रूममध्ये पकडले. गिते याला पोलीस खाक्या दाखविताच, निखिल नारायण आहिरे, विशाल अशोक गायकवाड, दिनेश तरवडे असे आम्ही मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सँमसग कंपनीचा ६ हजार रु. रेडमी कंपनीचा ३ हजाराचा मोबाईल असा ९ हजाराचा मुद्देमाला जप्त केला.
एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार पोना रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, दीपक शिंदे, राहुल सोळुंके, सागर ससाणे, मयुर गायकवाड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments