Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पारनेरमध्ये सारीसदृशने एकाचा मृत्यू


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील हंगे येथील शेतमजुराचा आज सारीसदृश आजाराने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश वासू (मूळ रा. वाशिम) असे मृत्यू झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. नगर येथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. पारनेर तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. मात्र, तालुक्यात सारीचा प्रवेश झाला आहे.
मूकबधिर असलेला गणेश वासू हा आजारी पडल्याने त्याला पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तीव्र ताप आल्याने उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वासू याची कोरोना चाचणी करण्यात आली. परंतुु तिचा अहवाल निगेटीव्ह आला होता. यानंतर त्याला पुन्हा नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू. वासू याची उत्तरीय तपासणी करण्यात आली. तो सारीसदृश आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले. तालुका आरोग्यअधिकारी यांनीही या माहितीला दुजोरा दिला.

Post a Comment

0 Comments