Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जामखेडमधील आणखी ०२ व्यक्ती कोरोना बाधीत ; जिल्ह्यात बाधितांची संख्या आता ४०


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. २४- जामखेड येथील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज आणखी ०२ व्यक्तींची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १४ झाली आहे.
बुधवारी कोरोना बाधीत आढळलेल्या २ व्यक्तींचे हे दोन्ही मित्र असून त्यांना लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या आता ४० झाली आहे. त्यापैकी २४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ०२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. *सध्या बूथ हॉस्पिटल मध्ये १२ रुग्ण असून या दोघांना आता तिकडे हलविण्यात येणार आहे.*
आज बाधीत आढळलेल्या व्यक्तींपैकी एक जण २३ वर्षाचा तर दुसरा १६ वर्षाचा असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.
काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांना बुधवारी लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले होते. त्यानंतर काल त्या दोन व्यक्तींपैकी एकाच्या वडिलांना तर आज त्यांच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले.     

Post a Comment

0 Comments