Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा, पानमसाल्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला ; नगर-सोलापूर रोडवर एलसीबीची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२४ - सोलापूर रोडवर दरेवाडी शिवारात कँन्टोन्मेंट नाका येथे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कांद्याच्या गोण्याखाली लपवून गुटखा, पानमसाल इ.तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी घेऊन जात असणारा टेम्पो एलसीबीच्या पोलिसांनी पकडला. या कारवाईत ५ लाख ४२ हजार २५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सलिम युसूफ शेख (वय २४,रा.भारतनगर, वाळुंज, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद), संतोष अशोक शिंदे (वय ३४, रा.श्रध्दानगर, बिडकीन, ता.पैठण, जि.औरंगाबाद) यांना पकडण्यात आले.


याबाबत समजलेली माहिती अशी की, गोपनीय मिळलेल्या माहितीनुसार एलसीबीच्या पोलिसांनी सोलापूर रोडवरील दरेवाडी शिवारातील कँन्टोन्मेंट नाका या ठिकाणी सापळा लावला. यावेळी या ठिकाणी अहमदनगरच्या दिशेने येणारा अशोक लेलँन्ड टेम्पो (क्रं.एमएच २० ईजी ८९१९) हा पकडला. यावेळी दोन पंचासमक्ष टेम्पोची तपासणी केली असता, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कांदे गोण्याखाली लापवून गुटखा, पानमसाल इ.तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करीत असल्याचे उघड झाले. या कारवाई पोलीसांनी ५ लाख ४२ हजार २५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सलिम युसूफ शेख (वय २४,रा.भारतनगर, वाळुंज, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद), संतोष अशोक शिंदे (वय ३४, रा.श्रध्दानगर, बिडकीन, ता.पैठण, जि.औरंगाबाद) या दोघांना अटक केली. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता हा तंबाखूजन्य माल सचिन म्हस्के (रा.वाळुंज, ता.गंगापूर) याच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली. दोघांना पुढील कारवाईसाठी एलसीबी पोलिसांनी भिंगार कँम्प पोलिसांच्या ताब्यात दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोना संतोष लोढे, रविंद्र कर्डिले, पोकाँ रोहित मिसाळ, प्रकाश वाघ, राहुल सोळुंके आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments