Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खेडले परमानंदच्या सराफला लुटणारे चोरटे जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२१- नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील सराफ निखिल बाळासाहेब अंबीलवादे यांना लुटणाऱ्यां चोरट्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा यशस्वी झाली आहे. शाहरुख सांडु सय्यद (वय २५, रा.चाँदनगर, बेलापूर, ता.श्रीरामपूर), सौ. अलीश अजीज शेख (वय ४०, रा.संजयनगर, श्रीरामपूर) असे पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.१ जानेवारीला पानेगाव ते खेडले परमानंद या रस्त्याने पानेगाव शिवारातून सराफ निखिल बाळासाहेब अंबीलवादे हे सोने-चांदीचे दागिने बँगेत टाकून ते दुकान बंद करून जात होते. या दरम्यान, तीन अनओळखी इसमांनी त्याच्या डोळ्यात मिरची फूड फेकून ७ लाख ९० हजार ७७८ रुपयांचा सोनेचांदीचे दागिने बळजबरीने चोरून नेली होती. या घटनेतील शाहरुख सय्यद व सौ.अलिश शेख ही चोरटे संजयनगर (श्रीरामपूर) येथे आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार संजयनगर येथे सापळा रचून सय्यद व शेख याना पकडले. यावेळी दोघांना ही पोलिस खाक्या दाखवताचा, सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही चोरट्यांना पुढील तपास करीत सोनई पोलीसांच्या ताब्यात दिले. 
जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकाँ मनोहर गोसावी, पोना रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, दिपक शिंदे, राहुल सोळुंके, प्रकाश वाघ, सुमेधा वाघमारे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments