Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित ५१ रिपोर्टपैकी ६ पाँजिटिव्ह


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर  दि.२ -जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांचे पुण्याच्या एन आय व्ही कडून गुरुवारी (दि.२) पाठविण्यात आलेल्या ५१ रिपोर्टपैकी ६ रुग्ण पाँजिटिव्ह असल्याची माहिती स्पष्ट झाली आहे.  ६ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झालेल्या मध्ये दोन परदेशी, दोन मुकुंदनगर तर दोन संगमनेर येथील नागरिक. परदेशी व्यक्तींपैकी एक इंडोनेशिया आणि दुसरा जिबुटी येथील बाधित व्यक्ती १७ ते ६८ वर्षे वयोगटातील असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

जामखेडमधील तिघा जणांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्येत वाढ झाली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने आता या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याची मोहिम गतीमान केली आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात २३ मार्च पर्यंत परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन तपासणी करण्यात येत आहे. परदेशातून आलेल्या व्यक्ती ज्या व्यक्तींच्या संपर्कात आल्या त्यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेने होती घेतले आहे. कोरोनाची लक्षणे जाणवत असतील, तर तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. विनाकारण माहिती लपवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
जामखेड येथील एका धार्मिक स्थळात थांबलेल्या परदेशी नागरिकांपैकी दोघा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्यांच्या सहकार्‍यांची तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या जामखेड मधील व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांच्या सहकार्‍यांचे स्त्राव नमुने चाचणी अहवाल प्राप्त झाला. त्यात ते कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या तीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. प्रशासनाने आता या तीन व्यक्तींच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींनाही ताब्यात घेतले असून या व्यक्ती इतर कोणाच्या संपर्कात होत्या, गेल्या काही दिवसात त्या कोणाकोणाला भेटल्या याची माहिती घेणे अद्याप सुरु आहे. 
आतापर्यंत आरोग्य यंत्रणेने ३७६ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील २८५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव आले आहेत. आतापर्यंत ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. उर्वरित रुग्णांना आता बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने आता बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणे, त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवणे याला प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत ४०० हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments