आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.७ - कोरोना संसर्गजन्य आजाराचा समाजात प्रसार होवू नये, परिस्थिती नियंत्रणात रहावी, यासाठी शहरात लाँकडाऊन लागू काळात कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. या पाश्र्वभूमीवर रस्त्यावर शाररिक कसरतीचे आणि साहसी खेळ दाखवून पोट भरणाऱ्या
मोमीन समाजातील कुटुंबांवर उपासमारीची वेळ येवू नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सिंग, अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, अहमदनगर शहर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, पीएसआय भोसले यांच्यासमवेत सामाजिक संस्थेचे विशाल लाहोटी आणि सदस्य संजय मानवेलीकर, विक्रांत नवले यांनी मंगळवारी (दि.७) मोमिन समाजबांधवांना उपजीविकेसाठी गहू,तांदूळ,तेल, दाल व इतर किराणा आणि जीवनावश्यक वस्तू साहित्याचे वाटप केले.
0 Comments