Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अत्यावश्यक वस्तू, सेवा आणि पुरवठ्याबाबत अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि. 01 -कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. तसेच दिनांक १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री व पुरवठयाबाबत, वाहतुकीबाबत काही अडचणी येत असल्‍यास त्‍याबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे 24 X 7 नियंत्रण कक्ष्‍ स्‍थापन करण्‍यातआला असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
या नियंत्रण कक्षासाठी समन्वय अधिकार्‍यांचीही नियुक्ती करण्यात आली असून नियंत्रण कक्ष आणि त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

नियंत्रण कक्ष क्रमांक - 0241-2343600, 0241-2323844 आणि टोल फ्री क्र.1077
---------------
पथक क्र. 1 - (सकाळी 08 ते दुपारी 04) 1) श्री. अजय मोरे, उपजिल्‍हाधिकारी भूसंपादन, क्र.15 अहमदनगर (मो. क्र. 7020252072) 2) श्रीमती भारती सागरे, तहसिलदार सं.गां.यो. अहमदनगर (मो. नं. 9623646032) 

पथक क्र. 2 - (दुपारी 04 ते रात्री 12) 1) श्री. जितेंद्र पाटील, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर (मों.नं.9763739974 ) 2) श्री.चंद्रशेखर शितोळे, तहसिलदार निवडणूक (मो. नं. 9881304874)

पथक क्र. 3 - (रात्री 12 ते सकाळी 08) 1) श्री. सी. एस. देशमुख, उपजिल्‍हाधिकारी भूसंपादन क्र.01, अहमदनगर (मो.नं. 7588642122) 2) श्री. महेश पवार, तहसिलदार पुनर्वसन (मो.नं. 8956799922)
तरी जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा, वस्तू आणि पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण अथवा समस्या जाणवत असेल तर त्यांनी या संपर्क क्रमांकावर आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.            

Post a Comment

0 Comments