Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दारू चोरून नेणारे व ती खरेदी करणाऱ्या सहा जणांना दि.२१पर्यंत पोलीस कोठडीआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी - राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील हॉटेल बाबाज परमिट रूम फोडून त्याचे सेटर तोडून हॉटेलमधली सुमारे एक लाखाची दारू चोरून नेणारे व ती खरेदी करणाऱ्या एकूण सहा आरोपींना शिर्डी पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता मंगळवार दिनांक 21 एप्रिल पर्यंत त्यांना पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.
या हॉटेल बाबा परमिट रूममध्ये झालेल्या चोरी संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी सांगितले की, सावळीविहीर फाटा येथे हॉटेल बाबाच परमिट रूम असून ते सध्या लॉक डाऊन मुळे बंद आहे ,या हॉटेलचे मालक महेंद्र जोंधळे अधूनमधून आपल्या या हॉटेलकडे चक्कर मारत होते. ते दि. 14 एप्रिल रोजी आपल्यासाठी हॉटेल वर पाहणी करण्यासाठी आले असता त्यांना आपल्या हॉटेलचे शटर तुटलेले दिसले ,नंतर त्यांनी पाहणी केली असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला यासंदर्भात गुन्हा नोंद केला, या बाबाच हॉटेल परमिट रूम मधून विविध कंपन्यांच्या बियर देशी-विदेशी अशा एकूण एक लाख सात हजार 840 रुपयाच्या दारू बाटल्या चोरी झाल्याचे तपासात उघड झाले आहे, त्यानंतर पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके नेमून या हॉटेल बाबाच परमिट रूम मध्ये शटर तोडून चोरी करणारे यांच्या शोधार्थ पथके रवाना केली ,या पोलीस पथकाने,महेश नारायण कापसे, यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवीची उत्तरे दिली, नंतर मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इतरांची नावे सांगितली त्याप्रमाणे या चोरी मध्ये सहभागी असलेले भोलेनाथ विजय चंदनकर ,आशिष बबन शेलार, विशाल अशोक आगलावे, तसेच ही चोरी करून ही दारू दामदुप्पट किमतीला विकणारे विजय भानुदास चव्हाण, मनोज विश्वनाथ वाघ यांनाही अटक करण्यात आली आहे , आज न्यायालयात हजर केले असता 21 एप्रिल2020 पर्यंत त्यांना पोलिस कस्टडी देण्यात आली आहे, अजूनही काही संशयित असून त्यांचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी यावेळी सांगितले,
या चोरीमुळे शिर्डी व परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे, सध्या शिर्डी व परिसरात कोरोणामुळे लॉक डाऊन सुरू आहे, या काळात सर्व बंद आहे, सर्व दारू दुकाने ,परमीटरूम ,वाईन्स सर्व बंद आहे, अशा परिस्थितीत येथील मद्यपी यांना दारू मिळणे मुश्किल झाले आहे, हे मद्यपी दारुसाठी काही करण्यास तयार होत आहे, या लॉक डाऊन'मुळे हॉटेल बाबाच परमिट रूम बंद होते, याचाच फायदा घेत रात्रीच्या वेळी तेथे कोणीही नसल्याचे पाहून या मद्यपीनी सावळविहीर फाटा येथील हॉटेल बाबाज परमिट रूम चे रात्री सेटर फोडून या हॉटेलमधील एक लाख सात हजार 840 रुपयाची दारू चोरट्यांनी लंपास केली आहे, अशी चर्चा येथे होती ,या प्रकाराने शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ,कारण सावळीविहीर जवळच निमगाव कोर्‍हाळे येथे नगरमनमाड रस्त्या लगत असणार्‍या आनंद बिअर शॉपी च्या पाठीमागे सुमारे 24 लाखाचे बिअर बॉक्स अवैध साठा केलेला असताना जिल्हा दारूबंदी उत्पादनशुल्क पोलीस अधिकाऱ्यांनी येथे धाड टाकून तो जप्त नुकताच केला आहे, सध्या या भागात अवैद्य दारुसाठा ही मोठ्या प्रमाणात करून ठेवण्यात आला असून दुप्पट-तिप्पट रकमेला त्याची गुपचूप विक्री होत आहे, चोरी करून हीच दारू बियर अधिक रकमेला े विकले जात असल्याच्या चर्चा येथे होत आहे, या चोरी प्रकरणी काही मद्यपी व काही पैसेवाले पुढारीही सामील असल्याची चर्चा आहे, मात्र राजकीय दबावापोटी म्हणा किंवा चिरीमिरी यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्नही होताना जाणवत आहे, सध्या लॉक डाऊन मुळे सर्व बंद असल्याने सर्व जण घरात आहेत, मात्र याचा काही टारगटांना , मद्यपींना हाताशी धरून पुढारी हे काम करतात की काय ।अशी शंका नागरिक उपस्थित करीत आहे ,काही दिवसांपूर्वीच राहता येतील देशी दारूचे दुकान फोडण्यात आले होते व नुकतेच सावळविहीर फाटा येथे असणारे हॉटेल बाबाच परमिट रूम शटर तोडून फोडण्यात आले व सुमारे एक लाख रुपयाची दारू चोरून देण्यात आली , परिसरात सध्या भुरट्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात घडत असून यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे, व जिल्हा दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी या परिसरातील अशा अवैध दारु साठेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे , अशी मागणी शिर्डी व परिसरातून सध्या होत आहे, व शिर्डी परिसरात असणाऱ्या अवैध दारू साठे ,अवैध गुटखा साठे यांची पोलीसांनी गुप्त पद्धतीने चौकशी करून साठेबाजांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Post a Comment

0 Comments