Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन पतीने तिला चाकूने भोसकून व स्वतःही गळफास घेतला ; शिर्डीतील संभाजीनगरामधील घटना
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी - येथील संभाजीनगर मध्ये पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन पतीने तिला चाकूने भोसकून व स्वतःही गळफास घेऊन जीवन. संपवले ,मात्र पत्नी जबर जखमी झाल्याने आसपासच्या लोकांनी तीला शिर्डीच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल केले. या प्रकाराने शिर्डी व परिसरात परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन मुळे शिर्डीच काय परंतु जिल्ह्यात शांतता वाटत असताना हा प्रकार शिर्डीत घडल्याने सर्वत्र मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.

यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शिर्डी येथील संभाजीनगर भागात राहणारे कैलास दिवाकर ठोकळ याची पत्नी अनिता कैलास ठोकळ या दोघांचे आपापसात नेहमी भांडण होत होते, कैलास ठोकळ आपल्या पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता ,यातून त्यांचे नेहमी वादावादी होत होती, असेच 17। 4 । 20 20 रोजी रात्री कैलास व।पत्नी अनिता याच्यांत चारित्र्याच्या संशयावरून दोघांत भांडण झाले ,त्यामुळे कैलास ठोकळचा मुलगा चंद्रकांत हा आपल्या घर मालकाला बोलण्यास जात असतानाच कैलास ठोकल्याने रागाच्या भरात चाकूने आपली पत्नी अनिता ठोकळ यांच्यावर वार केले, चाकूने अनिताला भोकल्यामुळे ती जबर जखमी झाली, व खाली पडली, हे पाहताच स्वतः कैलास ठोकळ याने दोरीने आपला गळा आवळून स्वतःचे जीवन संपवले, पत्नी मात्र जबर जखमी झाल्याने व मुलाने चंद्रकांत आरडाओरड केल्याने आसपासचे लोक जमा होऊन या जखमी महिलेला शिर्डीचे श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे, या प्रकरणाचा शिर्डी पोलिस अधिक तपास करत आहेत, लॉक डाऊन काळाची ही घटना घडल्यामुळे व सर्व शिर्डीत कडकडीत बंद असल्याने व अशी ही घटना येथे झाल्याने शिर्डी आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे,

Post a Comment

0 Comments