Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नेवाश्यात २ लाखाचा गुटखा, मावा, तंबाखूजन्य पदार्थाचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


 
  आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१८ - नेवासा येथे जुन्या कोर्टाजवळ वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून २ लाख ७२ हजार १२० रुपयांचा गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू इ. तंबाखूजन्य पदार्थाचा मुद्देमाल जप्त केला. सोहेल जुबेर शेख, जैन्नादिन बाबा शेख, सुलेमान ईसाक मनियार (सर्व रा.जुनी कोर्टगल्ली, नेवासा) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना राहत्या घरात गुटखा, सुंगधी तंबाखू, मावा मशिनच्या साहय्याने मावा तयार केला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनुसार नेवासा येथील जुन्या कोर्टगल्लीत पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकून सोहेल जुबेर शेख, जैन्नादिन बाबा शेख, सुलेमान ईसाक मनियार (सर्व रा.जुनी कोर्टगल्ली, नेवासा) यांना ताब्यात घेतले. जुन्या कोर्टगल्ली (नेवासा) तील वेगवेगळ्या ठिकाणीहून २ लाख ७२ हजार १२० रुपये किंमतीचा हिरा गुटखा, तयार मावा, सुगंधी तंबाखू, सुपारी, मावा तयार करण्यासाठीची मशिन असा मुद्देमाल जप्त केला. 
जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर पोलीस उपअधीक्षक दिपाली काळे-कांबळे, शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकाँ दत्ता गव्हाणे, मनोज गोसावी, पोना रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, सचिन आडबल, विश्वास बेरड, पोकाँ राहुल सोळुंके, प्रकाश वाघ, रविंद्र घुंगासे, शिवाजी ढाकणे, मपोकाँ सोनाली साठे, चापोकाँ सचिन कोळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments