Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डी व परिसरात अवैध गुटखा साठा व अवैध दारूसाठा करुन त्याची विक्री दाम दुप्पट घेऊन गुपचुपपणे सुरू !


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 शिर्डी - देशात,राज्यात कोराना मुळे लॉकडाऊन सुरू आहे. सर्वत्र संचारबंदी जारी आहे. सर्व बंद आहे. परंतु शिर्डी व परिसरात अवैध गुटखा साठा व अवैध दारूसाठा आणि त्याची विक्री दाम दुप्पट रक्कम घेऊन गुपचुपपणे सुरू आहे. यावर स्थानिक पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. जिल्हा पोलिसांनी तसेच जिल्हा दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी शिर्डीत नुकताच निमगाव - को-हाळे परिसरात छापा घालून लाखो रुपयाची बियर जप्त केली आहे. या मोठ्या कामगिरीने जिल्हा पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे.मात्र अजूनही अनेक ठिकाणी असे अवैध साठे या परिसरात असून जिल्हा पोलीस, जिल्हा दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकारी आणि जिल्हा अन्नभेसळ अधिकाऱ्यांनी याकडे गुप्त पद्धतीने व खब-यामार्फत चौकशी करून या अवैध व्यवसाय व अवैध दारू व गुटखा साठा करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


जिल्ह्यात, सध्या जिल्हाधिकारी साहेबांनी एका आदेशान्वये या लॉकडाऊन काळात कलम 144 लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे. जिल्ह्यातील सर्व देशी दारू दुकाने, परमीटरूम, वाईन्स शॉपी बंद आहे , मात्र अनेकांनी अवैधरित्या बियर, दारू यांचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला आहे. या बंद काळात दुप्पट, तिप्पट रक्कम घेऊन बिअर व दारूची विक्री गुपचुपपणे होत आहे, असे असताना स्थानिक पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाय राज्यात गुटखाबंदी पूर्वीपासूनच असताना सर्रास अनेक ठिकाणी गुटखा मिळत होता. आता तर लॉकडाऊन सुरू आहे, तरीसुद्धा अनेक ठिकाणी अवैध गुटखा साठा करून अनेक दुकानात गुपचुपपणे ह्या गुटख्याची विक्री केली जाते व मोठ्या प्रमाणात नफा कमवला जातो. स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याला नुकतेच बदलून आलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह तसेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी त्याचप्रमाणे नुकतेच शिर्डीमध्ये धाड टाकून अवैद्य बियरसाठा जप्त करणारे जिल्हा दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे लक्ष घालावे, तसेच जिल्हा अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी जिल्ह्यात गुप्तपणे व आपल्या खबऱ्या मार्फत चौकशी करून कोणत्या ठिकाणी अवैधगुटखा साठा करून ठेवला आहे. कोण गुटखा होलसेल व किरकोळ विक्री करतो, दाम दुप्पट ने गुपचुपपणे गुटखे विकून मोठा पैसा सध्या कमावतो, याचा तपास लावणे महत्त्वाचे आहे. शिर्डी व परिसरातील गावांमध्ये अवैध दारूसाठी अवैद्य गुटखा साठे मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी असताना मात्र स्थानिक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. स्थानिक पोलिसांचे यामध्ये काही गौडबंगाल आहे का? याची सविस्तर चौकशी करून अशा अवैध दारूसाठे व अवैध गुटखा साठे करून ठेवणाऱ्या व या लॉकडाऊंनच्या काळात अव्वाच्या सव्वा पैसा कमावणाऱ्या व्यापाऱ्यांवर, दुकानदारांवर,विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, सर्वसामान्य माणसांना बाहेर फिरणे मुश्कील होते. भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई होते. पण असे अनेक किराणा दुकानदार लॉकडाऊन चे नियम पाळत नाही, दिसण्या पुरते दुकानापुढे फक्त भावफलक लावून ठेवले आहे. तसेच सोशल डिस्टन्ससाठी अंतरा अंतरावर गोलाकार निशाणी करून ठेवले आहे, मात्र त्याचा प्रत्यक्ष उपयोग होताना दिसत नाही, अनेक ठिकाणी लोक दुकानासमोर गर्दी करून किराणा माल घेताना दिसतात. कोणतेही लॉकडॉऊनचे नियम पाळत नाही. अनेकांच्या तोंडाला मास्क ही नसतो. जर एखादा दुर्दैवाने कोरोना बाधीत रुग्ण दुकानदाराच्या संपर्कात आला तर त्या दुकानात गावातील परिसरातील हजारो लोक दररोज सकाळ-दुपार किराणा घेण्यास येत असतात, त्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता दाट होऊ शकते. त्यामुळे अशा ठिकाणी काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, मात्र या काळातच दामदुप्पट पैसा कमवण्याची संधी समजून हे व्यापारी या लॉकडाऊन च्या नियमाकडे दुर्लक्ष करीत आहे, कोणत्याही माल अधिक रक्कम घेऊन ग्राहकांना विक्री केली जाते, साठा कमी आहे ,मालाचे शॉर्टेज आले आहे, वरूनच किंमत वाढली आहे. मालाची गाडी आली नाही,असे अनेक कारणे दाखवून या मालाची किंमत वाढवली जात आहे.
तसेचजोपर्यंत पोलीस समोरआहे, तोपर्यंत नियमात सर्व दाखवले जाते, मात्र पोलिस व अधिकारी गेले की परत जैसे थे परिस्थिती होते. यावर आता पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी साध्या वेशात येऊन अशा ठिकाणी छापे घालणे, गरजेचे झाले आहे, सध्या गोरगरीब ,सर्वसामान्य माणूस घरात बसलेलाआहे, काम धंदा नाही. आर्थिक चणचण जाणवत आहे ,अशा परिस्थितीत व्यापारी, दुकानदार मात्र सर्वसामान्य गोरगरिबांची आर्थिक लुटालूट सध्या अनेक ठिकाणी करताना दिसून येत आहे, अश्या व्यापारी, दुकानदार व अवैध दारू गुटखा साठा करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिकारी व जिल्हा दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकारी तसेच अन्नभेसळ अधिकारी व कर्मचारी ,संबंधित सर्व विभागाचे अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष घालून अशा अवैध दारू साठा व अवैध गुटका साठा करणाऱ्या व दाम दुप्पट किंमतीने या वस्तू विकणारे तसेच किराणामाल जादा भावाने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर, साठेबाजांवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments