Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदत जाण्याची गरज : खा. डॉ. सुजय विखे पा.

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
श्रीगोंदा दि.११ - लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदत जाण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी समाजातील सक्षम लोकांनी पुढे येण्याची आवाहन खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी केले.

श्रीगोंदा येथे गरजू लोकांना जनसेवा फाउंडेशन मार्फत किरण साहित्याचे वाटप खा.डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

खा.विखे पुढे म्हणाले की, कोरोना साथीने हाहाकार माजला आहे या साथीला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लॉकडाऊन मध्ये सर्व भारतीयांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे या रोगावरती आपण सगळेजण मिळून मात करू. परंतु दरम्यानच्या काळामध्ये अनेक लोकांपुढे अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण सगळ्यांनी मिळून मदत केली पाहिजे व त्यासाठी समाजातील सक्षम लोकांनी पुढे येण्याचे आज गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पाळण्यात आले ! खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी अधिकारी व तहसीलदार नायब तहसीलदार यांच्याशी चर्चा करून सद्यस्थितीत काय परिस्थिती आहे याबाबत आढावा सुद्धा घेतला.

Post a Comment

0 Comments