Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव पाथर्डी येथील शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवणार : खा. डॉ. सुजय विखे पा.

 
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी दि.११ - कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातुन गरजु नागरीकांना खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या हस्‍ते साहित्‍याचे वितरण करण्‍यात आले. संपुर्ण अहमदनगर लोकसभा मतदार संघात शोशल डिस्‍टसिंगचा नियम पाळुन पाथर्डी शेवगाव येथील आढावा घेवून या मदतीच्‍या वितरणास प्रारंभ करण्‍यात आला. कोणत्‍याही संकटाच्‍या काळात जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातुन सामान्‍य माणसाच्‍या पाठीशी उभे राहाण्‍याचे कर्तव्‍य विखे पाटील परिवार बजावते. या राष्‍ट्रीय आपत्‍तीतही सामान्‍य माणसाला दिलासा आणि आधार देण्‍याचे काम करु अशी ग्‍वाही खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ सुजय विखे पाटील हे आज पाथर्डी, शेवगाव दौरा करून गरजूंना जनसेवा फाउंडेशन च्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले ,कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या लॉक डाउन काळात केल्या जाणाऱ्या उपाययोजना व इतर कामांबद्दल खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी नगर तालुक्‍यात आधिका-यां समवेत आढावा बैठक घेवून सुरु असलेल्‍या उपाययोजनांचा आढावा घेतला.
याप्रसंगी प्रांत अधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार नामदेव पाटील, बिडीओ सुधाकर मुंडे, आरोग्य अधिकारी डॉ. भागवान दराडे, नायब तहसीलदार नेवसे, नगरपालिका सिओ श्री. कोळेकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, बंडुशेठ बोरुडे, प्रतिक खेडकर, पी.आय. श्री. रत्नपारखी व आदी अधिकारी उपस्थित होते.
तसेच सदर बैठकीनंतर पाथर्डी तालुक्यातील मिरी, वसू पाथर्डी व निपाणी जळगाव या गावातील गरजूंना रेशन किटचे वाटप केले. तसेच निपाणी जळगाव येथे नागरिकांच्या सुविधेसाठी मोफत पाणी पुरवठा उपक्रमाची सुरुवात केली. 
- ---
शेवगाव तालुक्यातील कापूस फेडरेशन गोडाऊन बंद असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी यासंबंधी चर्चा केली तसेच सर्व प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचणार असे आश्वासन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली

Post a Comment

0 Comments