Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या अन्नधान्य वाटप

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१० - कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातुन गरजु नागरीकांना खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या हस्‍ते साहित्‍याचे वितरण करण्‍यात आले. संपुर्ण अहमदनगर लोकसभा मतदार संघात शोशल डिस्‍टसिंगचा नियम पाळुन तालुका निहाय आढावा घेवून या मदतीच्‍या वितरणास प्रारंभ करण्‍यात आला. कोणत्‍याही संकटाच्‍या काळात जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातुन सामान्‍य माणसाच्‍या पाठीशी उभे राहाण्‍याचे कर्तव्‍य विखे पाटील परिवार बजावते. या राष्‍ट्रीय आपत्‍तीतही सामान्‍य माणसाला दिलासा आणि आधार देण्‍याचे काम करु अशी ग्‍वाही खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या लॉक डाउन काळात केल्या जाणाऱ्या उपाययोजना व इतर कामांबद्दल खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी नगर तालुक्‍यात आधिका-यां समवेत आढावा बैठक घेवून सुरु असलेल्‍या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या अन्नधान्य वाटप उपक्रमाचा शुभारंभ केला.
जिल्‍ह्यामध्‍ये कोणत्‍याही संकटाप्रसंगी जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातुन सामान्‍य जनतेच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याचे कर्तव्‍य विखे पाटील परिवार बजावत असते. कोरोनाचे संकट ही तर राष्‍ट्रीय आपत्‍ती आहे. या प्रसंगी सामान्‍य माणसाला दिलासा देण्‍याचे मोठे काम सरकारी यंत्रणेबरोबरच सेवाभावी संस्‍था तसेच जबाबदार नागरीकांना करावे लागणार आहे. जनसेवा फौंडेशनन यामध्‍ये खारीचा वाटा उचलत असुन, या आपत्‍तीच्‍या काळात कोणताही माणुस उपाशी राहाता कामा नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्‍या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करतानाच जनसेवा फौंडेशनही जबाबदारीची भूमिका पार पाडेल असे डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्‍पष्‍ट केले. 
या बैठकीमध्ये धान्य पुरवठा, जनधन योजनेतील पैसे जमा होणे, संजय गांधी योजनेतील पैशांचे वर्गीकरण,तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टँकरचे प्रश्न, क्वारंटाईन असलेले रुग्ण व आरोग्य सुविधा याबाबत आधिका-यांशी चर्चा करुन भविष्‍याच्‍या दृष्‍टीने करावयाच्‍या उपाय योजनांबाबत त्‍यांनी मार्गदर्शन केले. या राष्‍ट्रीय संकटात जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातुन शासन यंत्रणेला कोणतीही मदत लागली तरी, आमचे सहकार्य राहील याची ग्‍वाही त्‍यांनी दिली. 
या बैठकीस तहसीलदार, प्रांत व तालुका आरोग्य अधिकारी, अन्नधान्य पुरवठा अधिकारी नायब तहसीलदार, गटविकास आधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
आज प्रथमतः वडगाव गुप्ता, नवनागापूर व निंबळक या तीन गावांमध्ये धान्य वाटप उपक्रमाला सुरुवात केली असून, पुढील काही दिवसांमध्ये इतर गावांपर्यंत आम्ही पोहोचू. तसेच सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत हे वाटप कार्य करण्यात येत असून, गरजू नागरिकांच्या घरांपर्यंत जाऊन रेशन किटचे वाटप करण्यात आले. 
याप्रसंगी सदर गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी, माजी सरपंच व सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्या महत्वपूर्ण सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या रेशन वाटपाच्या वेळी जनसेवा फाऊंडेशनचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments