Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्याठी जिल्हा प्रशासनाकडून समन्वय अधिकार्‍याची नियुक्तीअन्नधान्य आणि औषधांबाबतच्या समस्यांचे करणार निराकरण
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. ०१- जिल्‍हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या अनुषंगाने लॉकडाऊन असल्‍यामुळे जिल्‍हयातील जेष्‍ठ नागरीकांना अन्‍न -धान्‍य व औषधे मिळण्‍यास निर्माण होणा-या समस्‍यांचे निराकरण करणे आवश्‍यक आहे. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
यासंदर्भात जिल्ह्यातील कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांस काही समस्या उद्भवल्यास त्यांनी श्री.पांडुरंग वाबळे, सहाय्यक आयुक्‍त, समाजकल्‍याण अहमदनगर मो.क्र. 9960484358, कार्यालय फोन क्र.0241 - 2329378 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग प्रतिबंधात्‍मक कायादा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड 19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्‍यात आलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
श्री. वाबळे यांनी त्‍यांचे अधिनस्‍त मनुष्‍यबळ व साधन सामुग्रीचा यथोचित वापर करुन त्‍यांना सोपविण्‍यात आलेली जबाबदारी पार पाडावी, असे या आदेशात म्हटले आहे.        

Post a Comment

0 Comments