Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यात पोलीस अधीक्षक तर परराज्यात जाण्यासाठी पोलीस महासंचालकाकडून परवानगी घ्यावी लागणार


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - कोरोना विषाणू प्रसारण प्रतिबांधत्मक उपाय म्हणून लाँकडाऊन काळात राज्यामध्ये एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी पोलीस महासंचालक, मुंबई यांच्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अथवा दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. एखाद्या नागरिकांस सध्या रहिवाशी जिल्ह्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणे अत्यावश्यक असेल, तर त्या नागरिकांच्या कारणांची पडताळणी करुन संबंधित पोलीस उपायुक्त अथवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून त्या नागरिकास परवानगी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरिकास दुसऱ्या राज्यात प्रवास करणे अत्यावश्यक असेल, अशा नागरिकांनीच फक्त अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी मिळण्याकरिता पोलीस महासंचालक, मुंबई यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना माल वाहतूक करण्याची परवानगी असून त्यांना अटकाव येऊ नये, अशा वाहनधारकांना परवानगीची आवश्यकता नाही.

Post a Comment

0 Comments