Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीत साई पालखीमध्ये १४२ जण होम क्वोरोटांईन


विलगीकरण कक्षातून सोमवारी ३२ लोकांना सोडले घरी!

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी - सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असून या काळात सर्वसामान्य गरीब व मोलमजुरी करणारेचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा राहता तालुक्यातील परप्रांतीय व गोरगरीब आशा काही142 व्यक्तींना व संशयित रुग्णांना शिर्डी जवळील निघोज येथील साई पालखी निवारा मध्ये स्वतंत्र अशा विशेष कक्षामध्ये ठेवण्यात आले असून त्यांना येथे आरोग्य व सर्व सुविधा प्रशासन देत आहे य निवारा येथे 30 मार्च 20 20 पासून ह्या 142 लोकांना येथे ठेवण्यात आले आहे. यामध्ये 30 परराज्यातील आहे व 112 महाराष्ट्रातील आहे. त्यामध्ये बारा महिला व दोन मुले असून या सर्वांची देखभाल व्यवस्थित करण्यात येत आहे, तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व कोरोणाचे लक्षणे जाणवत असलेल्या रुग्णांना साई संस्थांच्या साई आश्रम फेस-2 धर्मशाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते, येथे एकूण 60 व्यक्ती विलगीकरण करण्यात आल्या होत्या , त्यांना काल 23 व आज एकूण 32 असे एकूण 55 व्यक्तींना पूर्ण बरे झाल्यानंतर आपल्या घरी सोडण्यात आले असल्याची माहिती राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

सध्या राज्यात कोरोणाने हाहाकार माजला असून जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, त्या अनुषंगाने जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे ,सर्वत्र काम धंदा बंद आहे, या मुळे सर्व गोरगरीब, मजदूर यांची उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे ,अशा लोकांना अडचण भासू नये किंवा त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून शिर्डी जवळील साई पालखी निवारा येथे विशेष कक्ष उभारण्यात आला आहे, या कक्षामध्ये गरजू ,गोरगरीब व संशयित एकूण 142 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे 30 मार्चला पासून येथे हे लोक ठेवण्यात आले असून 142 लोक राज्यातील आहे व 30 हे परराज्यातील आहे, यामध्ये बारा महिला व दोन मुले आहेत, या सर्व लोकांना सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गागरे व त्यांचे सर्व वैद्यकीय पथक आरोग्यसेविका दररोज तपासणी व औषध उपचार करत आहेत. त्याच प्रमाणे निमगाव निघोज शिर्डी चे कामगार तलाठी ही येथे देखरेख व व्यवस्था ठेवत आहेत, श्री साईबाबा संस्थान तर्फे या लोकांना सकाळ व संध्याकाळ दोन टाईम जेवण देण्यात येत आहे ,त्याचप्रमाणे इतर सामाजिक संस्थांकडून नाष्टा, दोन वेळेस चहा देण्यात येत आहे, तसेच या लोकांना टी-शर्ट, साबण, टूथपेस्ट व इतर आवश्यक सामान देण्यात आले आहे ,या लोकांची सर्व व्यवस्था प्रशासन उत्तम रीतीने करत असून या सर्व लोकांना या लॉकडाऊन काळात येथे ठेवण्यात येणार आहे.
तसेच श्री साई संस्थांच्या साई आश्रम फेस टू या धर्मशाळेत विलगीकरण कक्षात एकूण 60 व्यक्तींना ठेवण्यात आले होते, त्यापैकी काल तेवीस व्यक्तींना घरी सोडण्यात आले व आज सोमवारी बत्तीस व्यक्तींना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलेआहे, या सर्वांमधून आनंद व्यक्त होत होता व सर्वांनी प्रशासनाचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments