Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ना. विखे पा. यांच्याकडून राहाता तालुक्यात आरोग्य विभागाला १५ इन्फारेड थर्मामिटर उपलब्ध !

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी - सध्या देशात राज्यात कोरोनामुळे सर्वत्र मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवंसेदिवस कोरोनाचे रुग्ण वाढताहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. सध्या सर्वजण आपापल्या परीने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असाच एक प्रयत्न माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदार संघात केला असून नामदार राधाकृष्ण विखे त्यांनी राहाता तालुक्याला एकूण १०५ गावाकरीता १५ इन्फारेड थर्मामिटरची उपलब्धता आरोग्य विभागाला करुन दिली आहे.

१५ इन्फारेड थमिमीटरच्या माध्यमातून आशा वर्कर घरोघरी जावून गावातील नागरीकांचे आरोग्य सर्व्हेक्षण करतील.
अहमदनगर जिल्ह्यात फक्त आ.विखे पाटील यांनीच मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्फारेड थर्मामिटरची उपलब्धता करून दिल्याने आरोग्य विभागालाही एकाचवेळी सर्व गावांमध्ये सर्वे करणे सोपे झाले आहे. यामुळे तालुक्यात गावात घराघरात जाऊन प्रत्येकाची तपासणी करणे सोपे होणार आहे. त्यामुळे कोरा बाधित व्यक्ती आढळली तर ते लवकर समजणार आहे. या धोरणाचा प्रसार होऊ नये म्हणून काटेकोर अंमलबजावणी करणे आरोग्य विभागाला सोपे जाणार आहे. त्याचप्रमाणे राहता तालुक्यातील सर्वच गावांना नामदार विखे यांच्या प्रयत्नातून जंतनाशक फवारणी करण्यात येत आहे तसेच गरजूंना अन्न पाकिटे देण्याचे कामही सुरू आहे, अशा या मदतीमुळे तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments