Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीत 55 विलगीकरण केलेल्या रुग्णांपैकी तेवीस रुग्णांना आज पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडलेआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी - शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थांच्या साई आश्रम फेस टू या धर्मशाळेत संशयित कोरोना व कोरोना ग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या अशा 55 विलगीकरण केलेल्या रुग्णांपैकी तेवीस रुग्णांना आज पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.
राहता तालुक्यातील कोल्हार ,भगवतीपुर ,लोणी बुद्रुक लोणी खुर्द, हसनापूर ,,शिबलापुर आदि परिसरातून कोरोणाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण 55 व्यक्तींना शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान च्या साई आश्रम फेस टू येथील धर्मशाळेत स्वतंत्र विलगीकरण वार्ड तयार करुन विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले, या रुग्णांवर नेहमीच औषध उपचार तसेच त्यांना दररोज भोजन नाश्ता चहा याच बरोबर व सगळ्या महत्त्वाच्या आवश्यक सुविधा देण्यात येत होत्या. या 55 रुग्णांपैकी 23 रुग्ण पूर्ण बरे झाले आसून,त्यांना आज घरी सोडण्यात आले ,
येथे राहता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय गायकवाड,राहाता ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर गोकुळ घोगरे, डॉक्टर स्वाती म्हस्के तसेच साईबाबा संस्थांचे डॉक्टर ,त्यांचे पथक आरोग्यसेविका, यांनी या रुग्णांची विशेष दक्षता घेतली त्याचप्रमाणे साई संस्थानचे, कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, व अधिकारी श्री साई संस्थान चे प्रसादालयाचे प्रमुख विष्णू थोरात यांनीही या रुग्णांना भोजन ,नाष्टा ,चहा आदीची व्यवस्था ठेवली ,शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली साई आश्रम २ येथे स्वच्छता व फवारणी याची चोख व्यवस्था ठेवली, राहता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे रुग्णांची विशेष दक्षता घेण्यात येत होती, तहसीलदार कुंदन हिरे यांनी याकडे विशेष लक्ष दिले, व हे सर्व जण सध्याही या साई आश्रम फेज टू धर्मशाळेत असलेल्या विलगीकरण वार्डाकडे विशेष लक्ष देत असून येथे असलेल्या इतर संशयित व कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर रूग्णांवर व त्यांच्या उपचारावर ,आपल्या जिवाची पर्वा न करता विशेष ध्यान देत आहेत, वही उर्वरित बघूनही लवकरच बरे होतीलअशी आशा बाळगली जात आहे.
सध्या लॉक डाऊन सुरू असून नागरिकांनी घाबरून न जाता,कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्वरित सरकारी किंवा खासगी डॉक्टरांशी संपर्क करावा व प्रशासनाच्या दिलेले नियम पाळावे, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहान प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे. शिर्डी येथून पूर्णपणे बरे झालेल्या अशा तेवीस रुग्णांचे अभिनंदन करत त्यांना आपापल्या घरी रवाना करण्यात आले, या रूग्णांनी आम्हाला येथे अगदी व्यवस्थित व काही कमी न पडू देता चांगली।व्यवस्था ठेवली, याबद्दल या पूर्ण बरे झालेल्या रुग्णांमधून प्रशासनाचे व येथील सर्व झटणारे डॉक्टर ,नर्स , अधिकारी-कर्मचारी यांचे आभार मानण्यात येत होते.

Post a Comment

0 Comments