Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निमगाव को-हाळे येथे प्रतिबंधात्मक कालावधीत अवैद्य मद्यसाठा जप्‍त ; राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी - देशात तसेच राज्‍यात कोरोना विषाणूच्‍या संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍य शासनाने 30 एप्रिलपर्यत लॉकडाऊन जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात विविध प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असतांनाही राहाता तालुक्‍यातील निमगाव को-हाळे येथील आनंद बियर शॉपीच्‍या पाठीमागील बाजूस पत्राशेड गोडावूनमध्‍ये नामांकित कंपनीच्‍या बियर व वाईनचा मोठया  प्रमाणत  अवैध मद्याचा साठा  राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्‍त  केला आहे.  
जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्‍या आदेशानुसार जिल्‍हयातील  परिमिटरुम व मद्यविक्री दुकाने दिनांक 30 एप्रिल 2020 पर्यत बंद ठेवण्‍याचे आदेश दिले असतांनाही राहाता तालुक्‍यातील निमगाव को-हाळे येथील गोडाऊनमध्‍ये किंगफिशर बिअरच्‍या एक हजार बाटल्‍या, वडवायझर अशा वेग वेगळया 17 नामांकित कंपनीच्‍या 650 मिलीच्‍या 6 हजार 816 बाटल्‍या, 500 मिलीच्‍या 5 हजार 40 बाटल्‍या, 330 मिलीच्‍या 1 हजार 584 बाटल्‍या तसेच सुलाव्‍हाईट व रेडवाईन, पोर्टवाईन, मदिरा वाईनच्‍या 750 मिलीच्‍या 216 बाटल्‍या,  375 मिलीच्‍या 1 हजार 8 बाटल्‍या, 330 मिलीच्‍या 1 हजार 440 बाटल्‍या  असे एकूण बिअर व वाईनचे  964 बॉक्‍स अवैध रित्‍या बिअर व वाईनाचा मोठया प्रमाणात साठा  जप्‍त करण्‍यात आला असून  त्‍याचे अंदाजे किंमत  रुपये 24 लाख 39 हजार 72 रुपये इतकी आहे.
या प्रकरणी योगेश नंदकुमार कडलग ( राहणार  निमगाव को-हाळे ता. राहाता ) यास अटक करण्‍यात आली असून त्याच्याविरुध्‍द मुंबई दारुबंदी कायद्या 1949 चे कलम 65 (अ)(ई) नुसार गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. पुढील तपास राज्‍य उत्‍पादन शुल्‍क  कोपरगाव 1 चे दुय्यम  निरीक्षक अजित वडदे  हे करीत आहेत.  
जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे उपआयुक्‍त प्रसाद सुर्वे यांच्‍या आदेशानुसार अधीक्षक पराग नवलकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली  कोपरगाव विभागाचे निरीक्षक वी टी घोरतळे, अ विभाग अहमदनगरचे  निरीक्षक संजय सराफ भरारी पथक श्रीरामपूचे निरीक्षक अनिल पाटील, कोपरगावचे दुय्यम निरीक्षक अजित वडदे तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री धवल  गोलेकर, पी वी आहेरराव, कैलाश  क्षेत्रे, जवान सर्वश्री  निहाल उर्फ भाऊसाहेब भोर, निहाल शेख,  राजेंद्र कदम, विकास कंठाळे, प्रवीण साळवे,  पांडूरंग गदादे, या पथकाने सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments