Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

काळभैरवनाथ बचत गटाकडून गरीब व गरजू कुटुंबाना किराणा मालाचे वाटप

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 शिर्डी, दि.13:- कोरोना आपत्तीच्या  पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांच्यातर्फे तसेच वैयक्तिक पातळीवर गरीब व गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जात आहे. याच धर्तीवर  सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काळभैरवनाथ बचत गटाच्या माध्यमातून आगडगाव मधील गरीब व  गरजू कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
    राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत.  तळागाळातील कोणीही व्यक्ती उपाशीपोटी राहू नये या उद्देशाने गरीब व गरजू, रोजंदारीवर  काम करणारे, विधवा,अपंग महिला व नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत व्हावी या सामाजिक बांधिलकीतून  काळभैरवनाथ बचत गटानी पुढाकार घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगडगाव मधील गरीब व गरजू कुटूंबाना किराणा मालाचे वाटप केले आहे. शिवभोजन योजनेद्वारे स्वस्त दरामध्ये शासनातर्फै गरीबांना थाळी उपलब्ध करुन देयात येते, त्याच धर्तीवर सामाजिक बांधिलकीच्या नात्याने गरजूंना किराणा मालाचे वाटप करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच मच्छिंद्र कराळे यांनी दिली.
  सरपंच मच्छिंद्र कराळे, माजी सरपंच तुकाराम कराळे, बचत गटाचे अध्यक्ष भाऊसाहेब पालवे, सचिव किरण खाडे, सदस्य रामदास पालवे, विशाल दारकुंडे, उद्धव पालवे, जालिंदर कराळे, नवनाथ कराळे, ज्ञानदेव कराळे, अशोक कराळे यांनी या कार्यासाठी पुढाकार घेतला आहे.            

Post a Comment

0 Comments