Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

परमीट हाँटेल फोडून लाख रुपयांची दारु चोरी करणारा एक तर घेणारे दोघे अटक ; एलसीबी पथकाची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
राहाता दि.१२- तालुक्यातील पुणतांबा येथील सम्राट परमीट बार हाँटेल फोडून १ लाख ९९ हजार २०० रुपये किंमतीची विदेशी दारु चोरुन नेल्याप्रकरणी एकास व चोरीची दारु विक्री केल्याप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. तर दारु चोरीप्रकरणातील अन्य चारजण फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळलेली माहिती अशी की, दि.६ एप्रिलला रात्री हाँटेल सम्राटमधून १,९९,२०० रुपयांची विदेशी दारुचे २७ बाँक्स अज्ञातांनी चोरुन नेल्याप्रकरणी प्रशांत शशिकांत वाघ (पुणतांबा, ता.राहाता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहाता पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सुरू होता. या दरम्यान सीसीटीव्ही फुटेज अवलोकन केले असता, एलसीबी पो.नि.दिलीप पवार यांना सदर चोरी ही कैलास भानुदास कु-हाडे ( वय ३७ रा.चितळी ता.राहाता) याने केल्याची गोपनीय माहिती मिळाली. या आधारे पोलिसांनी सापळा लावून आरोपी कैलास कु-हाडे याला पकडले. त्याला पोलीस खाक्या दाखविताच, त्याने दारु चोरी गणेश ऊर्फ सिताराम भानुदास कु-हाडे (फरार), सचिन मधुकर कु-हाडे (फरार, दोघे रा.चितळी, ता.राहाता), राहुल सुरेश जाधव (फरार, रा.प्रवरासंगम, ता.नेवासा), संभा (फरार, पूर्ण नाव माहिती नाही, रा. भेंडाळा ता.गंगापूर जि.औरंगाबाद) आदिंनी मिळून केली, तर चोरलेली दारु बाँक्स ही गणेश कु-हाडे याच्या इंडिका गाडीतून घरी आणला. यातील दारु बाँक्स ही नितीन रामदास निकाळजे (वय २७, रा.गोंधवणी रोड, ता.श्रीरामपूर) व बाळू ऊर्फ कैलास पोपट झिरे (वय २४, नेवासा बु।।) याना विकल्याची कबुली दिली. दारु चोरीचा माल घेतल्याने निकाळजे, झिरे यांना अशा तिघांनाही पुढील तपासासाठी अटक करुन राहाता पोलिसांच्या ताब्यात दिले, असून, फरार दारु चोरट्यांचा पोलिस तपास करीत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक दिपाली कांबळे-काळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकाँ मनोज गोसावी, पोना रविंद्र कर्डिले, संतोष लोंढे, दीपक शिंदे, पोकाँ प्रकाश वाघ, कमलेश पाथरुड, रणजित जाधव, मेघराज कोल्हे, चापोकाँ सचिन कोळेकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments