Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून वर्क फ्राँम होम ; पाथर्डी एम एम नि-हाळी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

पाथर्डी तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार घरपोहच ! 
आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
पाथर्डी- येथील एमएम नि-हाळी महाविद्यालयातील ग्रामीण भागातील ५०० विद्यार्थ्यांना घरपोहच तर स्थानिकांना बोलवून शालीय पोषक आहार दिला. इ.५वी ते ११ वी च्या विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून 'वर्क फ्राँम होम' स्तुत्य अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या दोन्ही उपक्रमाचे पाथर्डी तालुक्यासह नगर जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर सुरु असलेल्या लोकडाउन दरम्यान, सँनिटायझेशन करुन सोशल डिस्टींसिंगचे नियमांचे पालन करीत एम एम नि-हाळी संस्थेच्या प्राध्यापक, शिक्षकांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालीय पोषण आहार हा दि.१४ ते दि.१७ एप्रिल कालावधी पोहच केला. तत्पूर्वी त्या संबंधित विद्यार्थीसह प्राध्यापकांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोनाबाबत जनजागृती केली. जनजागृती दरम्यान, खोकला, सर्दीचा त्रास जाणवल्यास सरकारी रुग्णालयात दाखवून निदान करा. स्वतः ला, कुटुंबाला पर्यायने गाव, शहर आणि देशाला कोरोना पासून वाचवा. यासाठी आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन विद्यालयाच्या प्राध्यापकांनी केले आहे. यात उपमुख्यध्याक श्री पाडोळे व श्री. नरोडे यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
हे कोरोनाबाबत प्रबोधन करीत असताना विद्यार्थ्यांचे शालीय नुकसान होऊ नये, यासाठी आधुनिक काळात मोबाइलच्या माध्यमातून 'वर्क फ्रोम होम' हा स्तुत्य अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ही सर्व संकल्पना प्राचार्य दिलीप गोरे यांची असून त्यास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, पालकांनी या स्तुत्य उपक्रमाबाबत कौतुक केले आहे. या उपक्रमासाठी स्टपला प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप गोरे यांनी मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू होऊन वेळ वाया जाऊ नये, या मागचा महाविद्यालय प्रशासनाचा उद्देश आहे. सर्व शिक्षकांच्या मदतीने सर्व पालकांचा व्हाँटस्एप ग्रूप बनविण्यात आला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जातो. तो विद्यार्थ्यांचा अभ्यास पालकांनी तपासण्यात यावा, यासाठी शिक्षक पालकांच्या संपर्कात असतात. या दरम्यान विशिष्ट वेळेत विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाते. या नव्याने सुरु केलेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सर्व घडामोडींचा फलित म्हटलं तर विद्यार्थी विकास विषयक चर्चाही शिक्षक व पालकांमध्ये होत आहे. दरम्यान, तालुक्यातील विद्यार्थ्यांना घरोघरी पोषण आहार वाटण्यासाठी  शिक्षिकांनी स्वतः ची गाड्या उपलब्ध करून दिली. यासाठी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य दिलीप गोरे, उपमुख्यध्यापक पडोळे, पर्यवेक्षक नरोडे यांनी व शिक्षकेतर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. वर्क फ्राँम होम' व तालुक्यातील विद्यार्थ्यांना घरोघरी पोषण आहार वाटप या नि-हाळी महाविद्यालयाच्या दोन्ही उपक्रमाचे माजीमंत्री बबनराव ढाकणे, गटशिक्षण अधिकारी शिवाजीराव कराड, संस्थेचे सचिव अँड प्रताप ढाकणे, जि.प. सदस्या प्रभावती ढाकणे, निरीक्षक निळकंठ देशमुख, समन्वयक तुपे, सहसमन्वयक जोशी आदिंसह सामाजिक संघटनांनी कौतुक करुन नि-हाळी संस्थेच्या सर्वच प्राध्यापक, शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments