Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी येथे बनावट दारु कारखान्यावर छापा


५ लाख ९१ हजार रु.चा साठा, मशिन जप्त, एक अटक ; एलसीबीची कारवाई
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी दि.१५ - येथील नजिकच्या माळी बाभूळगाव परिसरातील समर्थनगरातील विजय बाबुराव आव्हाड (रा.जांभळी, ता.पाथर्डी) यांच्या मालकीच्या घरामध्ये बेकायदेशीर वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल वापरून त्यातून मशिनच्या साहय्याने दारु तयार केली जात होती. ती दारु बाटल्यात भरून त्या बाटल्यांना वेगवेगळ्या नामांकित कंपन्याचे लेबल लावून त्या बाटल्या चोरून विक्री करणाऱ्या ठिकाणी छापा टाकून ५ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा साठा व मशिन जप्त करण्याची मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने माळी बाभूळगाव येथील समर्थनगरातील येथे बनावट दारु बनविण्याच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व पाथर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन पंचासमक्ष जाऊन छापा टाकला. यावेळी एकजण दारुच्या बाटल्या भरुन मशीनच्या साहाय्याने सिल बंद करीत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलीसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव, गाव विचारले असता, विजय बाबुराव आव्हाड (रा.जांभळी, ता.पाथर्डी) असे सांगितले. या ठिकाणी वेगवेगळ्या नामांकित कंपन्याचे लेबल लावलेल्या बाटल्या आणि बाटल्याचे झाकण सीलबंद करण्याचे असे एकूण ५ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नी दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे पोहेकाँ मनोहर गोसावी, पोना भागीनाथ पंचमुख, दिनेश मोरे, रवींद्र कर्डीले, संतोष लोंढे, विनोद मासाळकर, संदीप चव्हाण, पोकाँ मच्छिंद्र बर्डे, रोहिदास नवगिरे, चापोहेकाँ बबन बेरड, देवीदास काळे, पाथर्डी पोलीस ठाण्याचे सपोनि दिलीप राठोड, सफौ.खाटीक, पोहेकाँ अरविंद चव्हाण आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments