Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगरच्या नवीन जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंह यांनी पदभार स्विकारला


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२ - जिल्ह्यासाठी नव्याने जिल्हा पोलीस प्रमुखपदी मुंबई शहराचे पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंह यांची नियुक्ती झाली असून श्री सिंह यांनी गुरुवारी (दि.२) अहमदनगर जिल्हा पोलीस मुख्यालयात पदभार स्विकारला. यावेळी प्रभारी जिल्हा पोलिस प्रमुख सागर पाटील, शहर पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके आदिसह अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते.

नगर जिल्ह्यासाठी यापूर्वी ईशू सिंधु हे होते. सिंधु हे जिल्हा पोलीस प्रमुख गेल्यापासून काही महिन्यापासून जिल्ह्याचा चार्ज प्रभारी पोलीस प्रमुख म्हणून अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे यांच्याकडे होता. या कार्यकाळात श्री पाटील यांनी जिल्ह्यात कायदासुव्यवस्था आबाधित ठेवण्यात यशस्वी झाले. आता नव्याने आलेले जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंग यांनी पदभार स्विकारला आहे. प्रथम त्यांना वाळूतस्करांचे व गावठी कट्टा विक्रीचे रँकेटचे मोठे आव्हान स्विकारवे लागणार आहे. श्री सिंह हे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments