Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अँब्युलन्समधून लाखांच्या दारुची वाहतूक, तिघे अटक ; सिव्हिल हाँस्पिटल परिसरात धडकेबाज कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२९- शहरातील सिव्हिल हाँस्पिटल परिसरात छापा टाकून दारु असणाऱ्या मारुती व्हँन अँब्युलन्स, एक दुचाकी आणि दारु असा २ लाख ७० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तिघांना पकडण्याची धडकेबाज कारवाई तोफखाना ठाणे हद्दीत पोलिसांनी केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, जिल्हा पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांना नगर शहरातील सिव्हिल हाँस्पिटल परिसरातील सिव्हिल काँर्टर येथे पाण्याच्या टाकीजवळ सुझुकी अँक्सेसवरून विदेशी दारुची वाहतूक केली जात आहे, अशी माहिती मिळाली. या घटनेबाबत पाटील यांनी नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना याची माहिती देऊन कारवाईचे आदेश दिले. मिटके यांनी तोफखाना पोलीसांच्या पथकासह सिव्हिल परिसरात जाऊन सापळा लावला. या दरम्यान रस्त्याने येणारी सुझुकी अँक्सेस मोपेड (एमएच १६, सीजे ४४९६) वरील वीरु प्रकाश गोहेर (रा.सिव्हिल काँर्टर रुम नं.२७,अहमदनगर), राँबीन जाँर्ज कोरेरा (रा.सिव्हिल काँर्टर, रुम नं.७) यांना थांबवून पंचासमक्ष झडती घेतली. यावेळी त्याच्या ताब्यातून मास्टर ब्लेड कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी या दारु बाटल्या संजय हुंकारे याच्याकडून घेतल्या असून, हा त्याच्या अँब्युलन्समधून आम्हाला दारु माल काढून दिला आहे. त्याच्याकडे अजुन एक दारु बाँक्स आहे, अशी माहिती दिली. यावेळी तात्काळ पंचासमक्ष सिव्हिल परिसरात जाऊन संजय गंगाराम हुंकारे याला ताब्यात घेतले. त्याच्या अँब्युलन्स (एमएच १४, ईवाय १३६५) ची झडती घेतली, व्हँनमध्ये मास्टर ब्लेड कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. 
अँब्युलन्स (एमएच १४, ईवाय १३६५), सुझुकी अँक्सेस मोपेड (एमएच १६, सीजे ४४९६) व दारू जप्त करून वीरु प्रकाश गोहेर, राँबीन जाँर्ज कोरेरा, संजय गंगाराम हुंकारे यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किरण सुरसे, पोसई कष्णा घायवट, समाधान सोळंके, तोफखाना पोलीस ठाणे, तोफखाना डिबी पोलीस पथकातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments