Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विडी कामगारांना पाच हजार भत्ता द्या ; श्रीनिवास बोज्जा यांची कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर दि.२२- कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी देश ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. या काळात विडी कामगारांच्या हाताचे काम थांबले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नगर शहर व जिल्ह्यातील हातावर पोट असलेल्या हजारो विडी कामगारांना राज्य शासनाने प्रत्येकी पाच हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
तेलांगणा सरकारने विडी कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा जीवन•ात्ता जाहीर केला आहे. महाराष्ट्र शासनानेही बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये भत्ता जाहीर केला आहे. राज्य सरकारकडून राज्यातील सुमारे दीड लाख विडी कामगार मात्र दुर्लक्षित राहिले आहे. विडी कामगार हे हातावर पोट असलेले नागरिक असून त्यांना उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. लॉक डाऊनच्या काळात विडी उद्योग बंद झाला आहे. त्यामुळे विडी कामगार हाताला काम नसल्याने घरात बसून आहेत. या परिस्थितीत त्यांना आर्थिक सहाय्य मिळणे गरजे नगर शहरात ९० टक्के विडी कामगार हे पद्मशाली समाजातील असून त्यांची उपासमार जवळून पाहिली आहे. त्यामुळे बोज्जा यांनी पुढाकरा घेत थेट कामगार मंत्री दिलीप वळसे यांना पत्र पाठवित आर्थिक सहाय्याची मागणी केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरीब कामगारांसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. त्यातून विडी कामगारांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनाही पत्र देणार असल्याचे बोज्जा यांनी सांगितले.
.......................
कारखानदारांनीही द्यावी मदत
विडी उद्योग कारखानेही लॉकडाऊनमध्ये बंद आहेत. वर्षानुवर्षे पोटासाठी काम करणाºया कामगारांना  विडी कारखानदारांनीही आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे. विडी कारखानदारांनी कामगारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा.  स्वत: कारखानदारांची व शासनाची अशी मिळून मोठी मदत कामगारांना होईल अशी अपेक्षा बोज्जा यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments