Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहर काँग्रेसच्या वतीने २०० गरीब कुटुंबीयांना अन्नधान्याचे वाटप


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर : सावेडी उपनगर आणि औरंगाबाद रोडवरील विविध गरीब वस्त्यांमध्ये नगर शहर काँग्रेस आणि किरण काळे मित्र मंडळाच्या वतीने २०० कुटुंबीयांना किरण काळे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या महामारीने सध्या जगभर थैमान घातले आहे. याचा महाराष्ट्रावर देखील मोठा विपरीत परिणाम झालेला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १७ पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या गरिबांची मोठी गैरसोय झाली आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्याच्या हेतूने नगर शहर काँग्रेसच्या वतीने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना किरण काळे यांनी आवाहन केले की, नगर शहराची परिस्थिती गंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये. सोशल डिस्टन्ससिंगच्या नियमांचे पालन करावे. प्रशासनाला सहकार्य करावे. अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे.
युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या सूचनेवरून नगर शहरातील नागरिकांच्या लॉकडाऊनच्या काळातील समस्या सोडवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले. अन्नधान्य, भोजन, औषधे यासारख्या जीवनावश्यक बाबीसंदर्भात कुणाला अडचण असल्यास त्यांनी ९०२८७२५३६८ काँग्रेसच्या या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे.
शहर काँग्रेस आणि किरण काळे मित्र मंडळाच्यावतीने राबविलेल्या या उपक्रमात सागर काळे, राहुल चिखले, ओमकार भोसले, अभिजीत कुलकर्णी, स्वप्नील पाठक, निखिल खजिनदार, संदीप भिसे, आदित्य काळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Post a Comment

0 Comments