Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संबंधित तालुक्यात तालुका दंडाधिकारी सक्षम अधिकारी घोषित


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 अहमदनगर दि.14- कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी जिल्‍हयातील तहसील कार्यक्षेत्रासाठी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना सक्षम अधिकारी म्‍हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी  घोषित केले आहे. यासंदर्भातील आदेश त्यांनी जारी केले आहेत.   
      जिल्‍हाधिकारी श्री द्विवेदी  यांना साथ रोग अधिनियम 1897 अन्‍वये  निर्गमित करण्‍यात आलेल्‍या अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार  व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा कलम 30 अंतर्गत प्राप्‍त अधिकारानुसार नगर, नेवासा, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव , संगमनेर आणि अकोले तालुक्‍यात  कोरोना प्रतिबंधात्‍मक  उपाययोजना राबविण्‍यासाठी  त्या तालुक्यांचे तालुका दंडाधिकारी यांना त्‍यांचे कार्यक्षेत्राकरिता सक्षम अधिकारी म्‍हणून घोषित करण्यात आले आहे.
     तहसीलदार त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रात आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायद्यांतर्गत प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचे अंमलबजावणी प्रमुख म्‍हणून काम पाहतील व आवश्‍यक त्‍या सर्व उपाययोजनांची प्रभावी  अंमलबजावणी करतील.  तालुकास्‍तरावरील  इतर सर्व  विभाग त्‍यांचे निर्देशानुसार काम करतील. जलद प्रतिसाद संघ (रॅपिड रिस्पॉन्स टीम)  स्‍थापन करुन अत्‍यावश्‍यक वस्‍तू व सेवा यांची उपलब्‍धता व  वाहतूक यांचे काटेकोर नियोजन व अंमलबजावणी करावी, असे  आदेशात म्हटले आहे.      

Post a Comment

0 Comments