Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संचारबंदी काळात अहमदनगर शहरात दुचाकी फिरणाऱ्यांवर पोलिसांची नजर ; दुचाकी जप्त करून दंडात्मक करवाई

 
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.५ - संपूर्ण देशात करोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी १४४ कलमान्वये अहमदनगर शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू केली, असतानाही कारणास्तव व वर्तमानपत्र अथवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंध नसताना शहरात दुचाकीवर स्टिकर लावून फिरणाऱ्यांवर कारवाई करुन दुचाकी जप्त करण्याची कारवाई जिल्हा पोलीस प्रशासनाने केली आहे.


नगर शहरात कोरोनाच्या पाश्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग ठेवून संचारबंदी काळात अत्यावश्यक असेल अथवा जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी परवानगी दिली आहे. परंतु काही अपवाद नागरिक कारणास्तव किंवा वर्तमानपत्रांशी व वैद्यकीय क्षेत्राशी कोणताही संबंध नसताना दुचाकीवर फिरणाऱ्यांवर डिएसपी चौक, चितळीरोड, सावेडी यासह शहरात विविध ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस प्रमुख सागर पाटील व अहमदनगर शहर उपविभागीय अधिकारी संदिप मिटके यांच्या आदेशानुसार तोफखाना, कोतवाली, भिंगार कँम्प पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांवर कारवाई करून गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाई मुळे नगर शहरात कारणास्तव फिरणाऱ्यावर पोलीसांनी वचक निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments