Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आणखी १९ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. १९- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेले १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. 
रविवारी आणखी ३० जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, नेवासे येथील एका व्यक्तीचा १४ दिवसा पूर्वीचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसरा अहवाल काल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले होते. ही व्यक्ती तब्लीगी जमातच्या संपर्कात असल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. १४ दिवसानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधीताच्या संख्येतही वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णाची संख्या आता २९ झाली आहे. याशिवाय, मूळच्या श्रीरामपूर तालुक्यातील एका बाधीत रुग्णावर पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तेथेच त्याचा मृत्यू झाला होता. 

Post a Comment

0 Comments