Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गतच्या धान्याची गैरमार्गाने साठवणूक व काळाबाजार होत असल्यास संपर्क साधा : जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.३ - देशात कोरोना या आजारामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत शासन गरीब व गरजू अशा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना देय नियमित नियतनाबरोबरच प्रति सदस्य ०५ किलो याप्रमाणे मोफत तांदूळ उपलब्ध करून देणार आहे. परंतु अशा प्रसंगी ही काही समाज विघातक प्रवृत्ती यांचे कडून सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत च्या धान्याची गैरमार्गाने साठवणूक व काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे कोठे जरी आढळून आल्यास तातडीने जिल्हा पुरवठा कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याकडे फोन करून माहिती द्यावी, असे आवाहन अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी केले आहे.
सर्व सामान्य नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे शासकीय धान्याची गैरमार्गाने साठवणूक व काळाबाजार होत असल्यास तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय यांचे खालील क्रमांकावर संपर्क करावा.(०२४१-२३२०२३६), अहमदनगर शहराकरिता प्रदीप पवार, अन्नधान्य वितरण अधिकारी (८७६६४७११२६) आणि जिल्ह्यातील इतर तालूक्यांतील तक्रारिसंबंधी त्या त्या तालुक्यांचे तहसिलदार तसेच विजय उमाप, पुरवठा निरीक्षण अधिकारी (९४२२२३९९७७) व अभिजीत वांढेकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी (९४०३५८०२३५) यांचेशी थेट संपर्क करावा.परंतु, कोणीही तथ्यहीन माहितीच्या आधारे अथवा खोडसळपणे तक्रार केल्यास ,अशा व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments