Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना योध्यासाठी प्रोत्साहन भत्ता व फळबाग शेतकऱ्यांसाठी शेतमाल वितरण व्यवस्थेबाबत खा. विखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.२६ - कोरोना पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात घालून महसूल, पोलीस, आरोग्य कर्मचारी व सफाई कामगार महाराष्ट्राला कोरोना पासून लांब ठेवत आहेत त्यांच्या या कामगिरीमुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना चा उद्रेक झालेला नाही. कोरोना च्या लढाई मध्ये ह्या योध्या ची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन हरियाणा सारख्या राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता दिला आहे . मात्र दुसरीकडे महाराष्ट्र शासन आपल्या कर्मचारी वर्गाची पगार कपात करणार असल्याचे काही वृत्तपत्र आणि दृकश्राव्य माध्यमातून समजले. कोरोना विरुद्ध ह्या लढाईमध्ये ही कपात कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम करू शकते त्यामधून चुकीचा संदेश संपूर्ण यंत्रणेला जाऊ शकतो .त्यामुळे गरज पडल्यास इतर विकासकामांचा निधी कमी करुन प्राधान्य क्रमांक क्रमाने कोरोनातील युद्धं साठी वापरावा अशी मागणी खा. डॉ. सुजय विखे यांनी मुख्यमंत्र्यांना केली 

दुसरीकडे फळबाग शेतकऱ्यांनी अत्यंत मेहनतीने पिकविलेल्या शेतमाल मातीमोल दराने किंवा अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. महाराष्ट्र शासनाने पणन महामंडळ अथवा नाफेड सारख्या संस्थान मार्फत या शेतमालाची खरेदी करून रास्त दरात शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिल्यास शेतकरी व सामान्य नागरिक व शेतकऱ्यांची हाल-अपेष्टा थांबवता येईल याकडे सुद्धा खा. डॉ. सुजय विखे यांनी मुख्यमंत्र्यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले.
जामखेडमध्ये सरसकट 
कोरोना चाचण्या करण्याची मागणी
अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड वगळता इतर ठिकाणी कोरोना बाबत दिलासादायक चित्र आहे . जामखेड शहरांमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे ह्या मुळे जामखेड शहरांमध्ये सार्वत्रिक सर्वेक्षण करून सर्व सांशीयत रुग्णांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवावेत अशी मागणी खासदार तथा केंद्रीय आरोग्य समितीचे सदस्य डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली . यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व सहकार्य करण्याची ग्वाही सुद्धा विखे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments