Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बोधेगावात मावा बनविण्याच्या मशीनसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त ; एलसीबीची कारवाई आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव दि.२२ - तालुक्यातील बोधेगाव येथे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेऊन सुगंधी तंबाकू व मावा बनविण्याचे मशीनसह इ 1 लाख 64 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना शेख जमीर रशिद (रा बोधेगाव), रविंद्र पंढरीनाथ शिंदे (घोरतळे गल्ली बोधेगाव) हे राहत्या घरात चोरून महाराष्ट्र राज्यात सुगंधी तंबाखू विक्री बंदी असतानाही घरात मशिनवर तंबाखू मिक्स करत मावा तयार करुन विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी अचानक छापा टाकण्यात आला. या छाप्यात शेख जमीर रशिद (रा बोधेगाव), रविंद्र पंढरीनाथ शिंदे (घोरतळे गल्ली बोधेगाव) यांना ताब्यात घेतले. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या 
मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पो.नि दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार मनोज गोसावी,दत्तात्रय गव्हाणे,रवींद्र कर्डीले, संतोष लोंढे, राहुल सोळंके, रवींद्र घुंगसे,प्रकाश वाघ, सागर ससाणे, रोहिदास नवघिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments