Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सोनोशी ब्रम्हनाद मंदिर चोरीतील चोर जेरबंद ; एलसीबीची कारवाई


आरोपीकडून आव्हाने बु।। (शेवगाव) विठ्ठल मंदिरातील चोरीची कबुली
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.५ - पाथर्डी तालुक्यातील सोनोशी येथील ब्रम्हनाद मंदिरातील चोरीप्रकरणातील तिन चोरटे काळेगाव (ता.पाथर्डी) येथे पकडण्यात नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला यश आले आहे. प्रकाश उर्फ पक्या बबन पटारे, लक्ष्मण उर्फ लखन नवनाथ सातपुते, प्रितीभा नवनाथ भोसले (सर्व रा.काळेगाव, ता.पाथर्डी) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील सोनोशी ब्रम्हनाद मंदिरातील चोरी घटनेचे सीसीटीव्ही फुटेजनुसार ही चोरी प्रकाश उर्फ पक्या बबन पटारे याने केली असून तो काळेगाव (ता.पाथर्डी) येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी काळेगाव येथे जाऊन पटारे या चोरट्याला पकडले. पटारेला पोलीस खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत ही चोरी लक्ष्मण उर्फ लखन नवनाथ सातपुते, प्रितीभा नवनाथ भोसले याच्यासोबत केल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी काळेगाव येथे सापळा लावून सातपुते व भोसले याना पकडले. याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल पैकी ३५०० किंमतीचे सोन्याचे लाँकेट दोन पंचासमक्ष जप्त केले. आरोपीकडे इतर मंदिर चोऱ्याबाबत चौकशी केली असता, आरोपी पटारे याने साथीदारसह आव्हाने बु।। (शेवगाव) विठ्ठल मंदिरातील दानपेटी फोडून ४० हजार रोख रक्कम चोरून नेल्याची कबुली दिली. 
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, पोहेकाँ दत्ता हिंगडे, दादासाहेब काकडे, पोना सुनिल चव्हाण, भागीनाथ पंचमुख, रविंद्र कर्डीले, अण्णा पवार, दिनेश मोरे, पोकाँ विनोद मासाळकर, योगेश सातपुते, चापोहेकाँ बाळासाहेब भोपळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments