Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी मास्क वापर अनिवार्य ; सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास होणार शिक्षा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.१६- जिल्ह्यातील को रोना चाा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने आणखी कडक पावले उचलली आहेत. सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी आता प्रत्येक व्यक्तीला मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर संबंधीत प्राधिकरणाने दंडासह शिक्षा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीाड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आलेले आहे. त्यानुसार, जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत. 
या आदेशानुसार 1. सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्का वापरणे अनिवार्य आहे. 2. सार्वजनिक ठिकाणे, कामाची ठिकाणे आणि वाहतुकीचे ठिकाणांचे प्रभारी यांनी त्या ठिकाणी सोशल डीस्टांसिंगचे पालन होईल याबाबत दक्षता घ्याावी. 3. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही संघटनेने / व्यवस्थापकाने 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये. 4. विवाह आणि अंत्यसंस्कार याठिकाणी गर्दी जमणार नाही याबाबत नियमन करावे. 5. सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यास संबंधीत प्राधिकरणाने दंडासह शिक्षा करावी. 
6. दारू, गुटखा, तंबाखू इत्यादींच्या विक्रीवर बंदी असल्याने त्याचे सक्तीने पालन करावे व सार्वजनिक ठिकाणी कोणीही थुंकू नये याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, सर्व कामाच्या ठिकाणी १. तापमान तपासणीसाठी (Tempreture Screening) पुरेशी व्यवस्था करावी आणि सोयीस्कर ठिकाणी सॅनिटायझर्स पुरवावेत व हात धुण्याच्या ठिकाणांची संख्या वाढवावी.२.कामाच्या ठिकाणी शिफ्ट दरम्यान एक तासाचे अंतर ठेवावे तसेच कर्मचारी यांच्या जेवणाच्या वेळा ठरवून द्याव्यात जेणेकरुन सोशल डीस्टांसिंगचे पालन होईल. ३. वयाने 65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती आणि 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या पालकांना घरुन काम करण्यास प्रोत्साहित करावे. ४.सर्व खासगी व सार्वजनिक कर्मचारी यांना आरोग्य सेतूच्या वापरास प्रोत्साहित करावे. ५.सर्व संस्थांनी त्यांचे कामाची जागा शिफ्ट दरम्यान स्वच्छ कराव्यात.६.मोठ्या संमेलने / बैठका प्रतिबंधित कराव्यात. 
उत्पादक आस्थापना मध्ये (Manufacturing Establishments ) 1. हाताळण्यामत येणा-या पृष्ठभागांची वारंवार साफसफाई करणे आणि सर्वांना हात धुणे अनिवार्य करावे. २.कॅन्टीनमध्ये सोशल डीस्टांसिंगचे पालन होण्याकरीता कामाचे शिफ्ट आणि कर्मचारी यांच्या जेवणाच्या वेळा एकत्र होणार नाही याची दक्षता घ्यावी. ३.चांगल्या स्वच्छता पद्धतींबाबत (good hygiene practices) सखोल संवाद आणि प्रशिक्षण आयोजित करावे.
कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याास ते आपत्ती व्यवस्थापन कायदा मधील कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.     

Post a Comment

0 Comments