आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१५ - जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील पेट्रोल वितरण व्यवस्थेबाबद ( दि.१४ एप्रिल) काढलेल्या आदेशात काही त्रुटी राहिल्यामुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा कोलमडणार आहे. अत्यावश्यक सेवा कोलमोडणार नाही, यासाठी आदेशात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली असून तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दि. १४ रोजी बजावलेल्या आदेशात मुद्दा क्र. ७ मध्ये म्हंटले आहे की, पेट्रोल पंप सर्व खासगी दुचाकी, खासगी तीन चाकी, व खासगी चार चाकी वाहनांसाठी पेट्रोल विक्री पूर्णतः बंद करणेत येत आहे. शासकीय वाहने, अंबुलन्स, वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर व परिचारिका व वैद्यकीय सेवेशी निगडित कर्मचारी यांना ओळखपत्र तपासून सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत पेट्रोल विक्री करण्यात यावी, असे म्हटले आहे परंतु या आदेशात पेट्रोल विक्री दररोज सकाळी ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत, असा सुधारित आदेश आल्यास नोकरदारांना व अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना येणाऱ्या अडचणी दूर होतील, परंतु तत्पूर्वी लाकडाऊन यशस्वी होईल.
अहमदनगरच्या जिल्हाधिकारी यांनी बजावल्यामुळे बुधवार ( दि. १५ ) सकाळी पेट्रोल पंप चालकांनी पोलीस, गॅस वितरण चे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, नर्सिंगहोममध्ये वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी, अत्यावश्यक सेवा म्हणून स्थानिक तहसीलदार यांनी मान्यता दिलेली वाहने, अन्नछत्र चालविणारी परवानाधारक वाहने, लहान शेतकरी, तलाठी, ग्रामसेवक, नगरपालिका कर्मचारी यांची खाजगी वाहने याना आज सकाळी पेट्रोल मिळाले नसलेने अहमदनगर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेचा बोजवारा उडणार आहे. तसेच आज अन्नछत्र चालविणाऱ्या वाहनांना पेट्रोल मिळाले नाही तर हजारो गरजू लोकांपर्यंत जेवण पोहच होणार नाही.
अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेश्यातील किरकोळ त्रुटींमुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा कोलमडणार असल्याने जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पेचप्रसंग ओळखून तातडीने योग्य ती उपाययोजना करण्यासाठी याव्यात, असे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात गुलदगड यांनी म्हटले आहे.
0 Comments