Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ऑनलाईन नसलेल्या सर्वच शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यात धान्य द्यावेत ; सामाजिक संघटनाची शासनाकडे मागणी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / राजेंद्र गडकरी
अहमदनगर दि.८ - सध्या सर्वत्र कोरोनामुळे लॉक डाउन आहे, सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे राज्यातील रहिवाशांना योग्य व मुबलक अन्नधान्याचा पुरवठा व्हावा म्हणून शासनाने एक निर्णय घेतला असून तीन महिन्यासाठी प्रत्येक शिधापत्रिका धारकांना नेहमीप्रमाणे रेशन दुकानातून रेशन धान्य मिळणार आहेच, परंतु त्या व्यतिरिक्त प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत प्राधान्य लाभारथी (केशरी कार्ड) व अंत्योदय( पिवळे कार्ड) या कुटुंब धारकांना प्रत्येक व्यक्तीला पाच किलो तांदूळ तीन महिन्याला मोफत मिळणार आहे, एप्रिल ,मे, जून या तीन महिन्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचप्रमाणे ऑनलाईन नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना सुद्धा सरसगट या तीन महिन्यात धान्य देण्यात यावे अशी मागणी सामाजिक संघटनांनी शासनाकडे केली आहे.

प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी गर्दी न करता रेशन दुकानातून रेशन घेऊन जाण्याची आवश्यकता आहे, मात्र त्यासाठी कोरोना चा संसर्ग होऊ नये म्हणून दक्षता व लॉकडाऊनचे चे नियम पाळणे बंधनकारक आहे, रेशन दुकानदाराने ही कोरोनाचा संसर्ग होऊ नये किंवा वाढू नये म्हणून सर्व दक्षता घेणे गरजेचे आहे. आपल्या रेशन दुकानासमोर साबण, पाणी याची व्यवस्था करणे गरजेचे आहे, परंतु अनेक ठिकाणी असे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.
जर रेशन दुकानांमध्ये दुकानदारांनी काळाबाजार केला तर त्यावरही मोठी कारवाई होणार आहे, तसेच रेशन घेणाऱ्यांनी सुद्धा मास्क व सोशल डिस्टेंस ठेवणे गरजेचे आहे ,अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, त्यामुळे रेशन घेताना गर्दी करू नये , असे आवाहन करण्यात आले आहे,
सध्या कोरोना मूळे सर्वत्र लॉक डाऊन आहे ,त्यामुळे सर्व दुकाने बंद आहेत, अशा परिस्थितीत प्रत्येक कुटुंबाला अन्नधान्याची गरज आहे ,त्यांना अन्नधान्य कमी पडू नये म्हणून शासनाने निर्णय घेतला असून एप्रिल ,मे ,जून या तीन महिन्यात नेहमीप्रमाणे पिवळे रेशन धारकांना शिधापत्रिके वर 16 किलो गहू प्रत्येकी दोन रुपये किलो भावाप्रमाणे तसेच 19 किलो तांदूळ 3 रुपये किलो भावाने मिळणार आहे, त्याचप्रमाणे या पिवळे रेशन धारक कुटुंबांना प्रत्येक व्यक्तीमागे पाच किलो तांदूळ मोफत मिळणार आहे एप्रिल-मे,जून या तीन महिन्यात हे पाच किलो प्रत्येक व्यक्तीला तांदूळ मिळणार आहेत तसेच केसरी रेशन धारकांना सुद्धा प्रत्येक व्यक्तीला दोन रुपये किलो भवाने प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू व तीन रुपये भावाने प्रत्येक व्यक्तीला दोन किलो तांदूळ या प्रमाणे मिळणार असून या केशरी रेशन धारककांना सुद्धा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेनुसार प्रत्येक व्यक्तीला एप्रिल-मे जून या तीन महिन्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पाच किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. मात्र बहुतांशी शिधापत्रिका तारकांनी अजूनही आपले शिधापत्रिका ऑनलाईन केलेली नाही अशा शिधापत्रिकाधारकांना रेशन मिळणार नाही त्यामुळे त्यांनाही अन्नधान्य पुरवठा या संकट समयी करण्यात यावा. त्यासाठी ग्रामस्तरावरील कमिटी किंवा कामगार तलाठी यांची शिफारस किंवा पत्र ग्राह्य धरण्यात यावे , अशी मागणी कल्याण-डोंबिवली काँग्रेसचे अध्यक्ष मामा पगारे यांनी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.
सध्या च्या काळात कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहे. त्यामध्ये रहिवाशांना अन्नधान्य कमी पडू नये म्हणून शासनाने तीन महिन्यासाठी विशेष ही योजना अमलात आणली आहे. या योजनेचा शिधापत्रिकाधारकांनी लाभ घ्यावा, केसरी आणि पिवळे शिधापत्रिकाधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या काळात धान्य घेण्यासाठी रेशन दुकानावर रेशन घेणाऱ्यांनी गर्दी करू नये, तसेच मास्क बांधून व सोशल डिस्टंन्स ठेवून दक्षता घ्यावी, रेशन दुकानदाराने सुद्धा आपल्या दुकानासमोर हात धुण्यासाठी साबण पाण्याची व्यवस्था करावी, शिवाय या काळात कोणताही काळाबाजार करू नये, तसे आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल, असा इशारा पुरवठा विभागाने दिला आहे,
शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांमधून योग्य व फसवणूक न होता अन्नधान्य मिळावे यासाठी प्रत्येक गावात सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली कामगार तलाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक व काही प्रतिष्ठित गावातील व्यक्ती यांची एक समिती बनवून या रेशन दुकानावर वॉच ठेवण्याची गरज आहे. या काळात पॉजमशीन वर रेशन धारकांचे अंगठ्याचे ठसे घेतले जाणार नाही. त्यामुळे ती व्यक्ती ओळखण्यासाठी ही समिती, या समितीतील सदस्य यांची रेशन दुकानात उपस्थिती असणे गरजेचे आहे, असेही सूज्ञ नागरिकांनी म्हटलं आहे. 

Post a Comment

0 Comments