Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्ह्यातील हॉटस्पॉट ठिकाणी कंट्रोल रुम ; सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत : एसपी अखिलेश कुमार सिंह

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडीओ
अहमदनगर दि.१०- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मुकूंदनगर (अहमदनगर शहर), आलमगीर (अहमदनगर तालुका) नाईकवाडापुरा (संगमनेर शहर), जामखेड शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट आहेत. या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे कंट्रोल रुम सुरु करण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दिली.
हॉटस्पॉट क्षेत्राच्या मध्यबिंदूपासून जवळपास 2 कि.मी.चा परिसर हा कोअर एरिया म्हणून घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा वस्तु विक्री इत्यादी दि. 14 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी  दि.१४ एप्रिल मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी अत्यावश्यक सेवांसाठी (दूध व भाजीपाला फक्त) सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत खालील नमूद Whatsapp क्रमांकावर मागणी केलेल्या व्यक्तीचे नाव, संपर्क क्रमांक, पत्ता, आवश्यक मागणी (दूध/भाजीपाला) याचा उल्लेख द्यावा. नागरदेवळे ग्रामपंचायत व आलमगीर परिसरासाठी सर्व माहिती मो.८०८७८५२१२१,९४०३५४६२५०, ८५३०५६६२३९, ९८८१८६७२९६ ही सर्व नंबर फक्त सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments