Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दारु चोरणारे चोरटे काही तासातच जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२२- शहरातील सावेडी येथील राजानंदीनी परमिट रुम अँण्ड बिअर बारचा दरवाजा तोडून १ लाख ८ हजार ६७७ रुपयांची विदेशी दारु चोरणारे चोरटे काही तासातच अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. राजु रामा दास उर्फ दीपक सुरज नेटके (वय २६, रा.परिचय हाँटेलमागे,सावेडी, अ.नगर मु.रा.बांडगा, तुरवरिया जि.बारसर, राज्य ओरिसा), प्रसाद भारत पांडवा (रा.वेरुळ, ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. पुढील तपासासाठी दोघा आरोपींना मुद्देमालासह तोफखाना पोलीसांच्या ताब्यात दिले.

Post a Comment

0 Comments