Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रतिबंधात्मक कालावधीत मद्याची बेकायदा वाहतूक ; राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाकडून मद्याचा साठा जप्त


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.8- देशात तसेच राज्‍यात कोरोना विषाणूच्‍या संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी केंद्र व राज्‍य शासनाने 14 एप्रिलपर्यत लॉकडाऊन जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात विविध प्रतिबंधात्मक आदेश  जारी केला केला असतांनाही जिल्‍हयात अवैध देशी विदेशी मद्याची वाहतूक करणार्‍याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असून त्याचाकडील मद्याचा साठा आणि चारचाकी वाहन जप्‍त करण्‍यात आले आहे. 
जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्‍या आदेशानुसार जिल्‍हयातील  परिमिटरुम व मद्यविक्री दुकाने दिनांक 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेश  दिले असतांनाही पारनेर तालुक्‍यातील सुपा येथील हॉटेल सफलता समोर नगर-पुणे रोडवर एमएच-16 बीवाय 2417 महिंद्रा स्‍कॉपियो कंपनीच्‍या वाहनामध्‍ये 180 मि.ली. देशी दारुच्‍या 197 बाटल्‍या, विदेशी दारु मॅकडॉल व्‍हीस्‍कीच्‍या 406 बाटल्‍या , रॉयल स्‍टॅग 113 बाटल्‍या, ओ सी 44 बाटल्‍या, मॅकडॉल रम 28 बाटल्‍या, किंगफिशर बिअरच्‍या 25 बाटल्‍या असे एकूण 813 बाटल्‍या व वाहनासह एकूण अंदाजे 8 लाख 53 हजार 399  किंमतीचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला. याप्रकरणी दिपक आनंदा पवार (वय 39, राहणार सुपा ता. पारनेर) यास अटक करण्‍यात आली असून त्याच्याविरुध्‍द मुंबई दारुबंदी कायद्या 1949 चे कलम 65 (अ)(ई) नुसार गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. पुढील तपास राज्‍य उत्‍पादन शुल्‍क अ विभागाचे निरीक्षक संजय सराफ  हे करीत आहेत.  
जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे उपआयुक्‍त प्रसाद सुर्वे यांच्‍या आदेशानुसार अधीक्षक पराग नवलकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली अ विभागाचे निरीक्षक संजय सराफ, अण्‍णासाहेब बनकर, दुय्यम निरीक्षक विजय सुर्यवंशी, महिपाल धोका, कु.वर्षा घोडे, जवान सर्वश्री अरुण जाधव, वाय बी मडके, वाहन चालक पांडूरंग गदादे या पथकाने सहभाग घेतला.       

Post a Comment

0 Comments