Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करा ; शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांची मागणी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडीओ

अहमदनगर – राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड यांचे चित्र एडीट करून ते समाज माध्यमांवर टाकणाऱ्यास आव्हाड यांच्या उपस्थितीत मारहाण करण्यात आली, असा आरोप भाजपचे विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे.
डावखरे यांनी ट्वीट करत ही मोगलाई कि शिवशाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, ‘कोरोना राहू द्या, आधी मंत्री आव्हाडांपासून वाचवा! असे कॉमेंट करणाऱ्या सामान्य ठाणेकर नागरिकास मंत्री आव्हाड यांच्यासमोर मारहाण. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ही `मोगलाई’ का `शिवशाही’ जितेंद्र आव्हाड यांचं उत्तर –यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही उत्तर दिलं आहे, ते म्हणाले,’आपल्या नेत्यांबद्दल अस केले असते तर? पूर्वी तुमच्या नेतृत्वा विषयी बोलले तरी जेलमध्ये टाकले जायचे. त्याचे फेसबुक तपासा मग बोला. विकृतिचे समर्थन करता आहत.’असे म्हणत आव्हाडांनी तो आक्षेपार्ह फोटोही त्यांना पाठवला आहे. तसेच ‘कायदा हातात घेणाऱ्या कुणाला मी पाठिंबा देत नाही. पण तीच व्यक्ती सोशल मीडियाचा वापर राष्ट्रवादी नेत्यांविरूद्ध अश्लिल संदेशांसाठी करत होती. हे विकृत आहे का? तो तुमच्या सर्वांद्वारे संरक्षित आहे का ? त्याच्या सोशल मीडियाच्या गैरवापराची आणखी २०० पुरावे मी ठेवू शकतो’
ही घटना काय आहे –
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका सिव्हील इंजीनिअर तरुणाने गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त  वृत्तवाहिनीने दिलं आहे.
याबद्दल समजलेली अधिक माहिती अशी कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.५ एप्रिल रोजी रात्री ९.०९ मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट केली होती. यानंतर सदर तरुणाने मंत्री आव्हाड यांच्याबाबत सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.
या तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दि.५ एप्रिलला रात्री ११:३० च्या सुमारास साध्यावेशात पोलीस त्याच्या घरी आले आणि ‘पोलीस स्टेशनला तुम्हाला बोलवलं आहे’ असं सांगून सोबत येण्यास सांगितलं. कशासाठी घेऊन जाताय असं विचारले असता त्यांनी कारण सांगितले नाही. त्याच्या पत्नीने विचारले असता, १० मिनिटांत आणून सोडतो असं त्यांनी सांगितले.
यानंतर या पोलिसांनी त्यास पांढऱ्या रंगाच्या स्क्रॉपिओ गाडीत घेऊन गेले. यावेळी त्यांनी तरूणाकडील मोबाईल फोन काढून घेत, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विवियाना मॉल येथील नाथ बंगल्यावर घेऊन गेले, असं त्याचं म्हणण आहे. या बंगल्यावर जितेंद्र आव्हाड सुद्धा हजर होते. तिथे जाण्यापूर्वीच उपस्थितीत असलेल्या १५-२० जणांनी पोलिसांच्या फायबर काठीने तुटेपर्यंत पाठीवर, कंबरेवर, मांड्यावर मारहाण केली. काठी तुटली म्हणून त्यानंतर लाकडी काठी आणि लोखंडी पाईपने चक्कर येईपर्यंत बेदम मारहाण केली असा आरोप या तरुणाने केला आहे.
त्यानंतर आव्हाड यांनी पोस्ट का टाकली, असं विचारलं. यावेळी तरुणाने आपण अतिउत्साहात आणि भावनेच्या भरातही पोस्ट टाकली असं सांगत माफी मागितली. त्यानंतर आव्हाड यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून या तरुणाच्या घरी फोन करून त्याच्या पत्नीला ही पोस्ट काढण्यास सांगितले असे तरूण म्हणाला.
तसेच मला पुन्हा मारहाण करण्यात आली आणि ‘मी ही पोस्ट चुकून केली आहे. त्याबद्दल माफी मागतो,’ असा व्हिडिओ रेकॉर्ड करुन घेतला, असंही या तरुणाने सांगितलं. मारहाण झाल्यानंतर पोलिसांनीच मला रुग्णालयात नेलं आणि तिथे उपचार केल्यानंतर घरीही सोडलं असे तरुण म्हणाला.
यानंतर या तरुणाने वर्तकनगर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहेत. तसंच, या तक्रारारदार तरुणावरही देखील आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------
नितीन चौगुले (कार्यवाहक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान) यांचा शासनाला इशारा –
आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी फेसबुक वर एक व्हिडीओ टाकला असून यात त्यांनी जितेंद्र आव्हाड याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच शासनाने कारवाई केली नाही टर आम्हाला नाईलाजास्तव लॉक डाऊन तोडून ठाण्यात येऊन जितेंद्र आव्हाड यांना धडा शिकवावा लागेल असेही ते म्हणाले.
ठाण्यातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह अनंत खरमुसे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर काही पोस्ट टाकल्या होत्या. आणि त्या पोस्टचा राग मनामध्ये धरून महाराष्ट्रमधला एक नामर्द मंत्री जितेंद्र आव्हाड याने त्याच्या बंदोबस्तात असलेले काही पोलीस आणि गुंड अनंत खरमुसे यांच्या घरी पाठवून, पोलीस गाडी पाठवून त्यांचं त्यांच्या घरातून अपहरण केलं. आणि त्यांना स्वतःच्या बंगल्यात आणून काही गुंडांच्या मदतीने आणि तिथल्या पोलिसांच्या मदतीने प्रचंड मारहाण केली.
पोलिसांची फायबर स्टिक, लोखंडी रॉड वापरून त्यांच्यावर मारहाण करण्यात आली. मंत्री जितेंद्र आव्हाड या महाराष्ट्रातले कॅबिनेटमंत्री या हिंदुस्तानमध्ये संपूर्ण लॉकडाऊन चालू असताने संचारबंदी चालू असताना, आपत्ती व्यवस्थापन कायदा चालू असताना या मंत्री जितेंद्र आव्हाडला अश्या प्रकारचं कृत्य करणं शोभत नाही.
इतरवेळी वर्षभर सगळ्या भाषणात संविधान संविधान असं बोंबलत असणाऱ्या या जितेंद्र आव्हाडनी संविधान पायदळी तुडवल. एकट्या कार्यकर्त्याला जमाव जमवून मारहाण करणं एका महाराष्ट्रातल्या मंत्र्याला शोभत नाही. आम्ही महाराष्ट्र सरकारकडे , केंद्र सरकारकडे अशी मागणी करतो कि अश्या नालायक मंत्र्याला मंत्रिमंडळातून ताबडतोब हाकलून दिले पाहिजे. त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.
ज्या पोलिसांनी याच्या सांगण्यावरून मारहाण केली त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ केले पाहिजे आणि त्यांना कायम स्वरूपी अद्दल घडवली पाहिजे. त्या आव्हाडवरती मारहाणीचे सर्व गुन्हे टाकून त्याला अटक केली पाहिजे. त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे अश्या पद्धतीच मी महाराष्ट्र शासनाकडे आणि केंद्र सरकारकडे मागणी करतो.
जर महाराष्ट्र शासनाने अशी कारवाई नाही केली. तर नाईलाजास्तव महाराष्ट्रातील तमाम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्तेसह लॉकडाऊन तोडून ठाण्यामध्ये दाखल व्हावं लागेल आणि मग आमच्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांना उत्तर द्यावं लागेल.याची दाखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी.

Post a Comment

0 Comments