Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ग्रामीण भाग कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नगर जि.प. अधिकारी, कर्मचार्‍यांना टाळ्या वाजून मानवंदना

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : ग्रामीण परिसर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली असून, त्यांची अविरत सेवा करीत आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत सर्व अधिकार, कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन जिल्हा परिषदेत अध्यक्षासह पदाधिकारी यांनी टाळ्या वाजवून कौतुक करीत मानवंदना दिली.

संपूर्ण जगासमोर आव्हान ठरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन अविरत काम करीत आहे. एकीकडे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी कोरोना संशयित व कोरोनाबाधितांवर उपचार करीत असताना ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव करण्यासाठी नगर जिल्हा परिषदेचे जवळपास ४० ते ५० हजार अधिकारी योध्द्याप्रमाणे रणभूूमीत झुंज देत आहेत. कर्तव्य श्रेष्ठ मानून स्वत:च्या कुटुंबियांची पर्वा न करता जिल्हा परिषदेची यंत्रणा ग्रामीण भागात काम करीत आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांपासून ते जिल्हा परिषदेतील सर्वच वरिष्ठ अधिकारीही पूर्ण झोकून देवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहेत. मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत या अतिसेवंदनशील परिस्थितीत मोठी कामगिरी करीत असणाऱ्या पदाधिकारी, अधिकार्‍यांनी टाळ्यांंच्या कडकडाटात जिल्हा परिषदेच्या कोरोना वारियर्सचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments