Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना व्‍हायरस प्रभावित क्षेत्रातील भविष्‍य निधी सदस्‍यांसाठी हेल्‍पलाईन सेवा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि. 28- जे सदस्‍य कार्यालयात येण्‍यास असमर्थ असतील त्‍यांच्‍या मदतीसाठी कर्मचारी भविष्य निधी संघटन (ईपीएफओ) जिल्‍हा कार्यालयाच्या वतीने सोमवार दि. 27 एप्रिल 2020 पासून व्‍हॉटस्आप हेल्‍पलाईन सेवा सुरु केली आहे. या सेवेचा लाभ घेण्‍यासाठी आपले नाव, 12 अंकी युएएन नंबर, ऐच्छिक भाषा (हिंदी,मराठी व इंग्रजी) आणि कंपनीचे नाव ही सर्व माहिती मोबाईल क्रमांक 9422041289 वर फक्‍त संदेशद्वारे माहिती पाठविण्‍यात यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्‍या दूरध्‍वनी क्रमांक 0241-2411273 या क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळेत फोन करु शकता. ही हेल्‍पलाईन सेवा फक्‍त कोव्‍हीड 19 क्‍लेम प्रक्रियेत मदत करण्‍यासाठी आहे. जर कोणास आपल्‍या पेंडिग क्‍लेमसाठी तक्रार करावयाची असेल त्‍यांनी https://www.epfigms.gov.in वर करण्‍यात यावी, असे सहायक भविष्‍य निधी आयुक्‍त अभिषेक कुमार मिश्र यांनी कळविले आहे.
केंद्र शासनाने नॉव्‍हेल कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजना अंतर्गत ईपीएफओने त्यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्‍या कंपनीमध्‍ये काम करीत असलेल्या भविष्‍य निधी योजनेच्या सदस्‍यांसाठी स्‍कीम पॅरा 68 एल (3), ईपीएफ योजना 1952 जोडले गेले आहेत. सध्‍या जे सदस्‍य कोव्‍हीड-19 प्रभावीत झालेल्‍या क्षेत्रामध्‍ये काम करत आहेत. त्‍यांना भविष्‍य निधी खात्‍यातून ना परतावा अग्रीम देण्‍यात येणार आहे. सदस्‍य त्याचे तीन महिन्‍याचे मूळ वेतन व महागाई भत्‍ता किंवा आपल्‍या खात्‍यामधील शिल्‍लक असलेल्‍या रक्‍कमेच्‍या 75 टक्‍के या दोन्‍हीमध्‍ये जी कमी असेल ती रक्‍कम काढू शकेल.
या योजनेचा लाभ घेण्‍यासाठी आधारकार्ड नंबर आणि बँक खाते यु ए एन ला जोडल्‍यानंतर लाभार्थ्‍यांनी ऑनलाईन फॉर्म कोणत्‍याही स्‍मार्ट फोनद्वारे घरबसल्‍या जमा करु शकतात. 

Post a Comment

0 Comments